Maharashtra

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग…भिगी भिगी (लाखो रु) सडकोंमे…ऐसी बरसातों में खड्डे पडते हैं! एकाच पावसात खड्डे ही पडले लाखांचे!

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग…एका दिवसात झाला रस्ता 70 लाखाचा! एकाच पावसात खड्डे ही पडले 70 लाखाचे

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे गेल्या काही दिवसांत शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे.या पार्श्वभूमीवर शासनाचे आदेश नसताना अमळनेर नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.तसेच अमळनेर शहरातील दगडी दरवाजा ढासळत असल्याने येथील रस्ता बंद करून फरशी पुला कडून नदी काठाने गांधली पुरा भागातून वाहतूक वळविण्यात आली आहे.ह्या भागात रस्ता तयार करताना आडवे येणारे सर्व अतिक्रमण लॉक डाऊन काळातही शासनाचे आदेश नसताना काढून एकाच दिवसात रस्ता पूर्ण केला.

ह्या एकाच दिवसात तयार झालेल्या रस्त्याचे एकाच पावसात तीन तेरा वाजले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडले असून कामाचा दर्जेदार पणा यातून दिसून आला आहे. विशेष म्हणजे हा रस्ता बनविताना पर्यायी रस्ता न देता काम सुरू करण्यात आले होते.या रस्त्या विषयी अनेक शंका नागरिकांच्या मनात आहेत.उदा रस्ता निविदा प्रक्रिया केंव्हा राबविली,निविदा कोणी भरली,काम कोणाला दिलं, केंव्हा दिलं, शासकीय नियमानुसार निविदा प्रक्रियेचा कालावधी होता का,जाहिरात कोणत्या वर्तमानपत्रात दिली,किती निविदा प्राप्त झाल्या होत्या, निविदा प्रक्रिया पूर्ण करताना शासकीय नियमांचे उल्लंघन केलेले आहे याशिवाय वापरलेले बांधकाम साहित्य,मजुरी,लॉक डाऊन मध्ये इतक्या संख्येने मजूर कामावर ठेवून केलेला नियमभंग,संचारबंदी चे उल्लंघन, इतर सर्व सामान्य जनतेचे बांधकाम बंद असताना निम शासकीय संस्था रस्ता कसा बनवू शकते इ प्रश्न उपस्थित होत आहेत.

यामुळे एका दिवसातच रस्ता पूर्ण करून लाखो रु चा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा शहरात जोर दार पणे रंगली आहे.अत्यन्त निकृष्ठ दर्जाचे काम केल्या मुळे अवघ्या 15 दिवसांतच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.या भागातील रहिवासी तसेच असंख्य प्रवासी यांनी कुतूहल व्यक्त केले आहे आणि रस्ता बनला काय खड्डे पडले काय जोरदार पणे प्रसिद्धी केली काय आणि नगरपरिषदने “मिळवले” काय ?अशी दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू आहे.बाकी अमळनेर ची जनता हुशार आहेच त्यांना माहीत आहे की पडलेल्या पावसाचे पाणी कुठे जिरते आणि कुठे झिरपते ….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button