Pandharpur

पंतप्रधान आवास योजनेच्या लकी ड्रॉवरील बंदी उठविण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचेकडे

पंतप्रधान आवास योजनेच्या लकी ड्रॉवरील बंदी उठविण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचेकडे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंतप्रधान आवास योजनेच्या लकी ड्रॉवरील बंदी उठविण्याची मागणी
पंढरपूर- येथील पंतप्रधान आवास योजनेच्या लकी ड्रॉवरील बंदी उठविण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचेकडे केली आहे.पंढरपूर येथील कचरा डेपो, संतपेठ भागातील गट नं.१०० मध्ये पंतप्रधान आवास योजनेतील गरीबांसाठीचा ४००० घरांचे बांधकाम पूर्णत्वास येते आहे. त्याचा लकी ड्रॉ दि. २६ जानेवारी २०२० रोजी होणार होता. परंतू काही राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या कार्यकर्त्यानी त्याच्यावर विनाकारण सदरची जागा ही पूर नियंत्रण रेषेच्या आत येत असल्याचे कारण सांगून त्याच्यावर स्थगिती आणलेली होती.
परंतू सदरचे बांधकाम सुरु होण्याच्या अगोदरपासून त्यासाठी सर्व प्रकारच्या शासनाच्या परवानग्या आणलेल्या होत्या. परंतू राजकीय कारणामुळे काही कार्यकर्त्यानी खोटया तक्रारी करून वरील ड्रॉ काढण्यावर स्थगिती आणलेली होती.
वरील स्थगिती उठविण्यासाठी आपण विधान परिषदेमध्ये आवाज उठवून गरीब नागरिकांना न्याय मिळवून दयावा अशी विनंती विक्रम शिरसट यांनी सदरच्या निवेदनामध्ये केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button