कोरोनाच्या महामारी पादुर्भाव रोखण्यासाठी तलाठी विजय कुमार जाधव यांचा प्रयत्न
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कोरोना विषाणू व्हायरस महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत कोरोनाच्या धास्तीने शहरातील नागरिक खेडेगावाकडे आलेल्यांची संख्या जास्त असल्याने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पडत आहे
सोलापूर जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही दिवसेनदिवस वाढ होत असल्याने ग्रामीण भागातून प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कासेगाव येथील गावकामगार तलाठी भाऊसाहेब विजयकुमार जाधव हे दररोज सकाळी घरातून बाहेर पडताना रस्त्यावर कोणी गप्पा मारत बसलेले असतात त्यांना कोरोना विषयी माहिती देतात आणि गावात आल्यावर ऑफिस मध्ये न थांबता ते गावातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना घाबरून न जाता कोरोना मुक्तीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन घरात राहुन त्याला आपल्या गावातून तालुक्यातुन जिल्ह्यातुन राज्यातुनच नव्हे तर देशातुन हद पार करु यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जातं धर्म पंथ भेदभाव न करता एकत्रित लढा दिला पाहिजे आणि त्यात कासेगाव येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी जास्त प्रमाणात असल्याने गावात राज्य पर राज्यातील द्राक्ष नेन्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी येत असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांना शासनामार्फत दिलेल्या माहितीनुसार सुचनांचे पालन करण्यास सांगतात आणि पालन करुन घेत आहेत.तसेच कासेगाव हे 28 ते 30 हजार लोक संख्या असलेले गाव आणि त्यात भर म्हणून शहरातील नागरिक गावात मोठ्या संख्येने आल्याने व बाहेरील व्यापारी तसेच कामगार यामुळे गावातील सर्व प्रशासकीय यंत्रणेवर जबाबदारी विजयकुमार जाधव यांच्यावर आहे तसेच गाव मोठं असल्याने अशा परिस्थितीत लॉकडॉन चालू झाल्यापासून एक दिवस हि ते गैरहजर राहिले नाहीत,मि या गावाचा आणि गावं माझं एक कुटुंब आहे या प्रमाणे गावाची काळजी घेत आहेत, तलाठी भाऊसाहेब विजयकुमार जाधव यांनी उप विभागीय अधिकारी सचिन ढोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेऊन मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर व अवैध धंदे बंद करून गावांमध्ये शांतता नांदत आहे गावातून लोकवर्गणीतून जमा झाले रक्कम देशहितासाठी अन्न धान्य स्वरुपात उप विभागीय अधिकारी सचिन ढोले साहेब यांच्याकडे देण्यात आली तर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार्या आशा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासनामार्फत दिलेल्या माहितीनुसार सुचनांचे पालन करण्यास सांगितले आणि त्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटत केले आहे तसेच ग्रामसमितीमधील सर्व सदस्य यांना विस्वासात घेऊन गावात एक वेगळाच अनुभव पहायला मिळते आहे






