? राष्ट्रपती राजवट लागू करा..नारायण राणेंचे अमित शहाना पत्र
मुंबई : “आज जे कोणी सरकार विरोधात बोलतायत, त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगण्यात येतय. सरकार म्हणजे मुंबई पोलीस नाही. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा स्वार्थासाठी वापर केला जातोय. याचाच अर्थ कायदा-सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, अशी भयानह स्थिती आहे” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर टीका केली.
“भ्रष्टाचार बोकाळला आहे. करोना वाढतोय. करोनाबाबत कोणतेच नियोजन नाही. मुख्यमंत्रीचं वाझेंच समर्थन करतात. त्यामुळे असे अनेक वाझे तयार होतील असे राणे म्हणाले. या राज्यात मुडदे पडणार असतील, तर ते थांबवलं पाहिजे. म्हणूनच मी अमित शाहंना पत्र पाठवून कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली.”
“राज्यातील स्थिती हाताळायला सरकार कमी पडलय.
त्यामुळे मी अमित शाहंना पत्र पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे” अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.






