Maharashtra

नाशिक जिल्यात कोरोना विषाणू ची टेस्टिंग लॅब सुरू होणार मुख्यमंत्र्यांनी घेतली नामदार नरहरी झिरवाळ यांच्या पत्राची दाखल

नाशिक जिल्यात कोरोना विषाणू ची टेस्टिंग लॅब सुरू होणार
मुख्यमंत्र्यांनी घेतली नामदार नरहरी झिरवाळ यांच्या पत्राची दाखल

प्रतिनिधी सुनिल घुमरे

“सध्या जगात कुठेही व महाराष्ट्रात कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू ची टेस्टिंग लॅब सुरू करण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.आपले पत्रात म्हंटले आहे की.
सध्या देशात कोरोना विषाणू ची साथरोग परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रात तर सर्वात जास्त रुग्णांचीसंख्या आढळून आली आहे व रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही काही रुग्णआढळून आले आहेत. नाशिक जिल्हाची लोकसंख्येचा विचारकरता अंदाजे 65 लाखांचे आसपास आहे नाशिक येथे कोरोना विषाणू च्या टेस्टिंग साठी लॅब उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या कोरोना विषाणू च्या टेस्टिंग साठी सॅम्पल NIV पुणे आणि भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे पाठविण्यात येता. सदर चे टेस्टिंग नाशिक येथे होत नसल्याने रुग्णांचा वेळेत चाचणी चा रिपोर्ट होत नाही व पर्यायाने नमस्कार विलंब होतो. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास देखील विलंब होतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एक नविन कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करावी जेणेकरून रुग्णांना वेळेत रिपोर्ट येतील व उपचार पण लवकर सुरू करता येतील. तसेच त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व इन्फ्रास्ट्रक्चर इतर सर्व मिळावे अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांचेकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत संबंधितांना तश्या सूचना देखील केल्या आहेत.चौकट
सध्या जगात ,देशात व महाराष्ट्रात कोरोनाचे मोठे थैमान सुरू असून केंद्र व राज्य शासन त्यावर उपाययोजना करत आहे.राज्यात सर्वच जिल्यात कोरोना विषाणू टेस्टिंग लॅब आवश्यक आहेत.त्यामुळे लवकरच निदान झाल्यास कोरोनाला रोखता येईल.याबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे, पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक मध्ये कोरोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरू होईल अशी प्रतिक्रिया विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button