Nashik

ओझर येथे घरकाम करणाऱ्या आईची मुलगी पुणे पोलीस दलात प्रथम,

ओझर येथे घरकाम करणाऱ्या आईची मुलगी पुणे पोलीस दलात प्रथम,

वडील मृत्यूशी झुंज देत असताना अपूर्वाने भरल्या डोळ्यांनी दिला पेपर

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक:- एखाद्याची नियती कशी परीक्षा घेते याचा विचारही आपण करू शकत नाही. परंतु नियतीच्या या परीक्षेत जो स्वतःला झोकून देत आलेल्या प्रसंगाशी दोन हात करत संकटापेक्षा कष्ट किती मोठे आहेत हे आव्हान जेव्हा उभे करतो तेंव्हा नियतीलाही त्या जिद्दी पुढे हात टेकावे लागतात, अशीच काहीशी प्रचिती निफाड तालुक्यातील ओझरकरांना अनुभवायला मिळाली आहे. लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी करणाऱ्या एका आईच्या कष्टाची जाणीव ठेवून अपूर्वा वाकोडे पोलीस भरतीत उतरली आणि नुसती पासच झाली नाही तर पुणे शहर पोलीस दलात ती मुलींमध्ये प्रथम आली.

ओझर येथील मरिमाता गेट येथे पञ्याच्या व कौलारू घरात राहणारी अपूर्वा वाकोडे हिची नुकत्याच झालेल्या पोलीस भरती परीक्षेत पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. तिने पुणे शहर पोलीस दलात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे. अपूर्वांला पोलीस भरतीसाठी तिचे आजोबा रामदास गांगुर्डे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

अपूर्वांचा ज्या दिवशी पोलीस भरतीचा लेखी पेपर होता त्याच दिवशी तिचे वडील मात्र नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. टेलर काम करणारे राजू वाकोडे यांना पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता. तरी याही परिस्थितीत अपूर्वाने जिद्द न सोडता अश्रूंना डोळ्यात साठवून लेखी परीक्षा दिली. मात्र पेपर देऊन संध्याकाळी घरी पोहचताच राजु वाकोडे वडिलांनी जगाचा निरोप घेतला.

अनेक जन आपल्या अपयशाचे खापर स्वतःच्या गरीब परिस्थितीला देत असतात. मात्र अपूर्वा याला अपवाद ठरली आहे. आता तिला वडील नाहीत, आई आधीपासूनच लोकांच्या घरोघरी जाऊन धुनी भांडी करते. वेळप्रसंगी द्राक्ष बागेच्या व कांद्याच्या चाळीवर कामाला जात असताना अपूर्वा देखील आईला या कामात मदत करण्यासाठी द्राक्षबाग, कांद्याच्या चाळीत जाते. काम करूनच तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. स्वतः सोबतच दोन लहान भावांनाही शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले. परिस्थिती नाजूक असतानाही त्याची तमा न बाळगता मोठ्या हिमतीने यश संपादन करत इतरांना प्रेरणादायी कार्य केले आहे. गरिबीची हलाखीची परिस्थिती असून सुद्धा कशाप्रकारे यश मिळवता येते याचं हे उत्तम उदाहरण. पोलीस म्हणून मुलगी जेव्हा पुढे येते, तेव्हा तिच्या अंगी असलेली जिद्द आणि चिकाटी, ही गुणसंपदा खऱ्या अर्थाने प्रेरणा घेण्यासारखी आहे. प्रेरणादायी यश संपादन केल्याने ओझरकर तसेच अनेक समाजसेवी संघटना, ज्ञानेश्वरी अभ्यासिका मित्र परिवार व निफाड भाजप विधानसभा प्रमुख यतीन कदम यांच्यातर्फे अपूर्वांचा सत्कार करत कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. पोलीस वाहन चालक पदावर झाली निवड झाली

के व्ही. नाईक कॉलेजचा ४५ दिवसांचा क्लास पूर्ण केला. महिंद्रा फायनान्स संस्थेतर्फे आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एक हजार भरून घेण्यात येणारा मोटार ड्रायव्हिंग काम अपूर्वाेने पूर्ण केला होता. क्लास पूर्ण झाल्यावर एक हजार रु. परत मिळाले होते. याच प्रशिक्षणाचा तिनं फायदा घेत पोलीस वाहन चालक पदासाठी फॉर्म भरला होता. या भरती प्रक्रिया दरम्यान तिने बोलेरो, सुमो यासारख्या छोट्या वाहनांसोबत पोलीस बस व पोलीस टेम्पो ट्रॅव्हलर यासारखे मोठे वाहन चालवून दाखवत यश संपादन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button