Nashik

वाल्मिकी मेघवाल मेहतर समाज संघर्ष समिती यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे मागणी

वाल्मिकी मेघवाल मेहतर समाज संघर्ष समिती यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे मागणी

नाशिक्र शांताराम दुनबळे

नाशिक-:नाशिक शहरातील वाल्मिकी मेगवाल मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील सफाई कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल जिल्हाअधिकारी श्री सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. नाशिक महानगरपालिका प्रशासन कोरोनाव्हायरस या महामारीच्या धरतीवर सफाई कामगारांना कोणत्याही सुविधा तर दिलेच नाही याउलट या कामगारांचे नुकसान कसे होईल याच्या विरोधात निर्णय घेऊन साफसफाईची कामे ठेकेदार कडून करून घेण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आले असल्याचे तसेच दलित व विशिष्ट समाजातील सफाई कामगारांना मुद्दाम कोवीङ-19 सेंटरमध्ये काम देणे त्यांच्याकडून औषध फवारणी करून घेणे.रुग्णांच्या घरी या कामगारांना मुद्दाम पाठविणे.असे वर्तन केले जात आहे. ठेकेदारांना पोसण्यासाठी कोविड महामारी मध्ये नेमून दिलेली कामे इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे.यामुळे एका सफाई कामगारांचा मृत्यू झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालक मंत्री नामदार छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. यावेळी सुरेश दलोड,सुरेश मारू, रंजीत कल्याणी, रमेश मकवाना, जितेंद्र परमार,रोकी पवार,शेखर चव्हाण,संजय बाबरिया, धर्मेश मारू,सोनू बेहनवाल,यांच्या निवेदनावर सह्या आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button