Nandurbar

या वर्षी आखाड्यांचे आकर्षण राहणार अविस्मरणीय.

या वर्षी आखाड्यांचे आकर्षण राहणार अविस्मरणीय.

नंदुरबार/शेख फहिम महोम्मद

शेकडो वर्षांची परंपरा असलेले मोहर्रम व त्यात आपला जिल्हा नंदुरबार मध्ये आखाड्यांची विशेषता अविस्मर्निय असते, मागील 2 वर्ष कोविड मुळे कुठले ही सन साजरे करता आले नसल्याने या वर्षी मा. मुख्यमंत्री यांनी सर्व बंदी उठवल्याने कोणालाही फक्त हेच विचारावंसे वाटते कि “How is the Josh”.
आखाड्यांची विशेषता अशी कि विविध तालिमिचे आखाडे मोहर्रमच्या 09 तारखेला त्या त्या तलिमिचे उस्ताद यांच्या अध्यक्षतेखाली काढले जातात ज्यात देखाव्यांसह त्या त्या तलिमितिल उस्तादने आपल्यां शिष्यांना काय काय तालिम दिली ते वर्षातून एकदा आम जनतेसमोर दाखवले जातात. ही शेकडो वर्षांची परंपरा असुन यात मुलांचे शारीरिक बळकटीकरण व दम बनतात तसेच ते लाठी चालविणे, पटा फिरविणे, संग्राम फिरविणे, चक्र, तमाच इत्यादी विद्येत ही हुनरमंद होतात. ज्याला शहरासह इतर शहर व जिल्ह्यातील लोक बघण्यास येतात.
या वर्षी शहरातील नवाजलेली पंच मंडळ हैदर तालीम, संगिमियाँ तालीम, इलाही तालीम, चिराग अली तालीम, मलकवाडा तालीम, अली साहब मोहल्ला येथील अली तालीम अश्या विविध तालीमिंची बैठका होवून कार्यकारण्या घोषित ही करण्यात आले असुन सर्व आखाडे हे अविस्मरणीय राहतील हे नक्की.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button