Amalner

न.परिषद प्रशासनाला हुतात्म्यांचा पडला विसर…की हेतुपुरस्कर होते आहे दुर्लक्ष ????

न.परिषद प्रशासनाला हुतात्म्यांचा पडला विसर…की हेतुपुरस्कर होते आहे दुर्लक्ष ???

संदीप सैदाणे

अमळनेर शहराच्या प्रमुख चौकाचौकात नगर परिषदेच्या च्या माध्यमातून बहुजन महामानवांचे स्तुप,प्रतिमा,नामकरण,शुशोभिकरण या कामांचा सपाटा सुरू आहे. प्रत्येक चौकात महामानवांच्या प्रतिमा स्थापित केल्या जात आहेत. यावर लाखो रुपये खर्च केला जात आहे. असे असतांना स्वातंञ्याच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंञ्य सेनानींचे चौक दुर्लक्षीत व अडगळीत पडले असुन नगरपरिषद प्रशासन त्या बाबींकडे गांभिर्यपूर्वक लक्ष देत नसून चौक शुशोभिकरनासाठी तसेच हुतात्मा स्मारक दुरुस्ती साठी नागरीक आग्रही आहेत.

? पहिले स्मारक पाच कंदील चौकातील सन १९४७ मधील ऐतिहासीक ब्रिटीशकालीन गोळीबारातAAAA शहीद झालेले हुतात्मे

अनुक्रमे

१) कॉ.श्रीपत श्रावण पाटील,

२) कॉ.गंगाधर भिला बोरसे,

३) कॉ.मुकूल झुमकीराम,

४) कॉ.शंकर मोतीराम,

५) कॉ.सोनु रंगा चांभार,

६) कॉ.शंकर धोडूबा,

७) कॉ.श्रीपत भिला,

८) कॉ.बन्सी जीवन कोळी.इ नीं बलीदान दिले असुन संबधीत सेनानी कडे प्रेरणा व मार्गदर्शक म्हणून जनता पहाते .

? दुसरे स्मारक पैलाड पोलीस स्टेशन समोर असलेले हुतात्मा स्मारक असेच धूळ खात पडले आहे.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिक

१) श्री कन्हैयालाल प्रजापती,अमळनेर

२) गोविंद बोन्डे

३) नंदनलाल पुरोहित

४) गंभीर पाटील

५) सैतन साळी

६) खेमचंद न्हावी

७) जंगलू सुतार

८) श्रीमती दोधा बाई तेली

९) शंकर माळी

१०) श्रीमती अनिताबाई पुरोहित

११) बाबुराव चौधरी

१२) करीम खाटीक

१३) श्रीमती रामदुलारी तिवारी

१४) यशवंतराव माणिकराव

१५) रामदास पाटील

१६) रतनलाल उपाध्ये

१७) पुरूषोत्तम सोनार

१८) रामनिवास पुरोहित

१९) विश्राम चव्हाण इ स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची सुखाची होळी करत आहुती दिली आहे. विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश आहे.आज हे स्मारक धूळ खात पडले आहे. आजूबाजूला प्रचंड घाण कचरा असून दुरुस्ती च्या प्रतीक्षेत आहे.

? तिसरे स्मारक हुतात्मा स्मारक पंचायत समितीच्या जवळच म्हणजे नंदू चहा च्या टपरी जवळ आहे.विशेष म्हणजे येथे अनेक अधिकारी कर्मचारी चहा घेण्यासाठी नित्य नियमाने येत असतात.हे स्मारक सन 1939 ते 1945 च्या जागतिक महायुद्धात अमळनेर तालुक्यातील 219 सैनिक दाखल झाले होते त्यापैकी खलील सैनिक दुसऱ्या महायुद्धात शहीद झाले होते.अमळनेर येथून 145 इतर ठिकाणाहून 52 असे सैनिक शहीद झाले आहेत.

१) विठोबा भोष्ठे

२) दालू पाटील

३) लक्ष्मण ओंकार

४) नामदेव भिला

५) पुरुषोत्तम विनायक

६) गंगाराम कोळी

७) भिसंगीर गोसावी इ सैनिकांनी बलिदान दिले आहे.

सध्या या स्मरकांवर कुत्रे बसलेले असतात. कुत्रे मूत्र विसर्जन करतात,लोक पिचकारी मारतात, आजूबाजूला प्रचंड प्रमाणात घाण,कचरा,विमलच्या पुड्या,सिगारेट चे थोटुक, इ पडलेले असते.ही सर्व स्मारके जीर्ण झाली असून दुरुस्ती च्या प्रतीक्षेत आहेत.हुतात्म्यांच्या कार्यकर्तुत्वाचे स्मरण म्हणुन तरी प्रशासनाने या स्मारकाची दखल घ्यावी व स्तंभ व्याप्ति करून चौक शुशोभिकरण आणि चौक ऩामकरण करावे ही मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button