Amalner

?स्वच्छ सुंदर अमळनेर चा बोजवारा..! राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे झाले हातधरणे.. तरी नगरपरिषदेला जाग येईना..!

?स्वच्छ सुंदर अमळनेर चा बोजवारा..! राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे झाले हातधरणे.. तरी नगरपरिषदेला जाग येईना..!

अमळनेर शहराच्या सुंदर अमळनेर स्वच्छ अमळनेर चे स्पष्ट पणे बारा वाजले आहेत.अमळनेर शहराला सुंदर स्वच्छ अमळनेर चा पुरस्कार देखील मिळाला आहे.एव्हढच नव्हे तर अमळनेर शहर सुशोभित करण्याचा विडा अमळनेर नगरपरिषदेने उचलला आहे.आणि आता मात्र शहरात ठिक ठिकाणी लावलेल्या झेंड्या मुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याकडे अमळनेर नगरपरिषद सोईस्कर पणे दुर्लक्ष करत आहे की आमदारांच्या दडपशाही ला बळी पडत आहे..? की माजी आमदार आता जरी बीजेपी त असले तरी ..! नेमकं आळी मिळी गुप चिळी करण्याचं कारण समजत नाही..!

?स्वच्छ सुंदर अमळनेर चा बोजवारा..! राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे झाले हातधरणे.. तरी नगरपरिषदेला जाग येईना..!

काही दिवसांपूर्वी अमळनेर शहरात भारतीय जनता पक्षाचे बॅनर,झेंडे लावण्यात आले होते. ह्या मुद्द्यावर विरोध करत तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार यांनी विरोध केला होता.व अमळनेर शहराचे विद्रुपीकरण होत आहे आणि झेंडे आणि बॅनर काढायला भाग पाडले होते.यावेळी तक्रार देखील करण्यात आली होती. आणि हा विषय संपुर्ण अमळनेर मध्ये विशेष प्रकारे गाजला देखील होता.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथे दि 1 नोव्हेंबर 2020 रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विविध कामांच्या उद्दघाटनांसाठी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस शिवसेना या राजकीय पक्षांनी गृहमंत्री च्या स्वागतासाठी संपुर्ण अमळनेर शहराच्या मुख्य रस्त्यांवर राजकीय झेंडे लावले होते.आजतागायत हे झेंडे काढण्यात आले नसून ज्या जागी लागले आहेत तेथे च ते फाटायला सुरुवात झाली आहे. हा त्या त्या पक्षांच्या झेंड्याचा तर अपमान तर आहेच पण शहराचे विद्रुपीकरण देखील होत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची कार्यवाही नगरपरिषद कडून केली जात नसून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा या संदर्भात सुरू आहे.

?स्वच्छ सुंदर अमळनेर चा बोजवारा..! राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे झाले हातधरणे.. तरी नगरपरिषदेला जाग येईना..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button