Maharashtra

गावात चावडीवर मोठ्याने भाषण देणाऱ्या पुढाऱ्यांनो कोरोनाच्या धास्तीने घरातच का जनतेसाठी बाहेर या

गावात चावडीवर मोठ्याने भाषण देणाऱ्या पुढाऱ्यांनो कोरोनाच्या धास्तीने घरातच का? जनतेसाठी बाहेर या

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

अमळनेर शिरूड परिसरात 1 कोरोना रुग्ण आढळल्याने गावात खळबळ माजली असता गावात एकप्रकारे कोरोनाचे ग्रहण लागले आहे या बाबत काही आजी माजी पुढारी जे गावात, चावडी वर भाषण देतात हातभर काकडी दीड हात बी लोकांना तरुणांना सल्ले देतात असे काही पुढारी या गावाला लाभले आहेत. या अगोदर शहरात कोरोना पाँझीटिव्ह रूग्ण आढळत असतांनाची गावाची परिस्थिती वेगळी होती त्यावेळी गावची तात्पुरती दखल घेणारे नंतर गायब झाले
आता तर गावातच कोरोना शिरला आहे अशा संकटात गावातील ग्रामपंचायत पदाधिकार्यांना प्रशासनाला ज्ञान ज्ञानाचे डोस देणाऱ्या पुढाऱ्यांनो आता ही खरी लढाई आहे आता गावासाठी रस्त्यावर उतारा या व कोरोना युद्धा म्हणून काम करा गावात तेच ते पदाधिकारी(सरपंच -पोलीस पाटिल व शासकिय कर्मचारी ) फीरतांना व भेटतांना दिसत आहेत ग्रामपंचायत सदस्य हि आहेत कुठे? असा प्रश्न विचारला जातो आहे. आपण सर्वांनी गावात शिरलेल्या कोरोनाशी दोन हात लढा व गावातील जनतेचे रक्षण करा गरीब जनतेकडे मतदान मागण्याच्या वेळेस दिलेले आश्वासन तुम्ही कसे पुर्ण करणार हे देखील गरीब जनतेला आता जरा दाखऊन द्या. गावातील जनतेला सुरक्षितेची खरी गरज आहे कोरोना संकटात साधारण नागरिकांवर दिवस कशा प्रकारे येऊन ठेपले आहेत त्यानां घरो घरी जाऊन विचारा हीच खरी वेळ धावून जाण्याची व गावात कोरोनासारख्या संकटांवर कशा प्रकारे मात करता येईल नागरिकांचा कसा बचाव होईल या कडे लक्ष द्या योग्य ते मार्गदर्शनही करा. अशी अपेक्षा ग्रामस्थांकडुन व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button