Kolhapur

आखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका विभागप्रमुख पदी वैदेही श्रीकृष्ण पाध्ये

आखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका विभागप्रमुख पदी वैदेही श्रीकृष्ण पाध्ये

सुभाष भोसले -कोल्हापूर
गगनबावडा (ता.गगनबावडा) येथील वैदेही श्रीकृष्ण पाध्ये यांची आखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर’च्या गगनबावडा,पन्हाळा शाहूवाडी तालुका विभाग प्रमूखपदी निवड करण्यात आली.

वैदेही पाध्ये यानी गगनबावडा तालुक्यामध्ये ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक चळवळ व ग्राहक संरक्षण कायद्याविषयी लोकजागृती करून गगनबावडा या दुर्गम तालुक्यात महिलांचे मजबूत संघटन निर्माण केल्यामुळे त्यांना गगनबावडा तालुका महिला अध्यक्ष पदावरुन पदोन्नती देवून गगनबावडा पन्हाळा शाहूवाडी तालुका विभाग प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली.

नेवासा,जिल्हा अहमदनगर येथे ९ व १० नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रांतिक अधिवेशन प्रसंगी ही निवड जाहीर करण्यात आली.
आखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष अरुण यादव यांच्या उपस्थितीत निवडीबाबतचे नियूक्तीपत्र देण्यात आले.

त्यांना जिल्हा अध्यक्ष अरुण यादव,जिल्हा महिला अध्यक्षा अॅड.सुप्रिया दळवी,जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी,शिवनाथ बियानी,जिल्हा सचिव सर्जेराव खाडे, तालुका अध्यक्ष विश्वनाथ पोतदार,पूष्पा पाटील,अरुणा पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button