Amalner

अमळनेर : जिथे कमी तिथे आम्ही… उमेद अभियान आणि बचत गटाच्या  ध्येयवेड्या जलरागिनी केला कोंडावळ गावचा पिक नियोजनाचा सर्वे पूर्ण

अमळनेर : जिथे कमी तिथे आम्ही… उमेद अभियान आणि बचत गटाच्या ध्येयवेड्या जलरागिनी केला कोंडावळ गावचा पिक नियोजनाचा सर्वे पूर्ण

अमळनेर तालुक्यामध्ये समृद्ध गाव मिनी स्पर्धा भाग दोन चे काम सुरू आहे पाणी फाउंडेशन च्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये जलव्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामध्ये गावातील गावातील पीक नियोजनाचा सर्वे करण्यासाठी कोंडावळ गावामध्ये गावच्या शेत शिवारामध्ये कोंडावळ गावाने 2020/21 व व 2021/22 साली द्वि हंगामी व बारमाही तसेच रब्बी हंगामातील घेतलेल्या पिकांचा तसेच त्या पिकांना कोणत्या पद्धतीने पाणी दिले जाते व ते पीक किती क्षेत्रावर ते घेतले जाते या सर्व घटकांचा पीक नियोजनाचा सर्वे कोंडावळ गावातील या जलरागिनी मिळून केला व गूगल शीट वरती ऑनलाईन देखील भरून पूर्ण केला हा पीक नियोजनाचा सर्वे पूर्ण केल्यामुळे पाठी मागील वर्षी व्दि हंगामी बारामही तसेच रब्बी हंगामामध्ये तसेच या वर्षी व्दि हंगामी बारमाही व रब्बी हंगामातील वेगवेगळ्या पिकास किती कोटी लिटर पाणी लागले हे समजणार आहे त्याच बरोबर पाठी मागील वर्षी पेक्षा जास्त पाणी लागले का कमी पाणी लागले हे देखील यामुळे समजणार आहे तसेच व्दि हंगामी पीक किंवा बारमाही पीकास इथून पुढे किती महिने पाणी शेतकरी कोणत्या पद्धतीने देणार तसेच त्या पिकास किती पाणी लागणार याची माहिती मिळणार ही सर्व माहिती ग्रामसभेमध्ये किंवा गाव सभेमध्ये गावासमोर मांडल्यामुळे गावाला आपण कशा पद्धतीने पीक नियोजन केले पाहिजे किंवा करावयाचे याचा उद्देश समजणार यासाठी कोंडावळ गावातील जलरागिनी आपल्या कुटुंबाचे तसेच आपल्या शेतीचे काम सांभाळून प्रयत्नांची पराकाष्टा करून हा पीक नियोजनाचा सर्वे पूर्ण केला व जिथे कमी तिथे आम्ही हे सर्व ग्रामस्थांना दाखवून दिले या महिलांचे काम अनेक गावातील जलमित्र समृद्ध गाव योद्धे सामाजिक कार्यकर्ते राजकीय व्यक्ती यांना प्रेरणा दायी ठरेल अशा पद्धतीने या जलरागिनी काम केले आहे त्यांच्या कार्यास पाणी फाउंडेशन चा सलाम????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button