कळंब पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत(मामा)पवार यांनी जपली माणुसकी
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे तसेच संपूर्ण तालुक्यात ‘मामा’ या नावाने ओळखले जाणारे कळंब पोलिस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार यांनी माणुसकीचे आगळेवेगळे दर्शन घडविले आहे.
आषाढी एकादशी ला जाणाऱ्या वारकऱ्यांना कळंब कर अन्नदान करायचे, पण या वर्षी लॉक डाऊन मुळे वारी न झाल्याने अन्नदान करता आले नाही पण पोलिसांच्या खाखी वर्दी ने माणुसकी चे दर्शन घडवून येणाऱ्या..जाणाऱ्या प्रवाशांना पो.को. चंद्रकांत पवार यांनी वडील के.किसनराव पवार यांच्या स्मरणार्थ माऊली माऊली म्हणत मास्क व केळीचे वाटप केले.
कळंब .. केज रोडवर पोलिस यांचे चेक पोस्ट आहे. या रस्त्यावरून प्रवाशांची मोठी ये..जा असते. प्रत्येक वर्षी दीडशे चे जवळ पास दिंड्या याच मार्गावरून जातात या वेळी सहर व ग्रामीण भागातील अन्नदाते मोठ्या प्रमाणावर अन्नदान करतात.या वेळी मात्र ते होऊ शकले नाही याची खंत सर्वानाच होती परंतु पोलिस चंद्रकांत पवार यांनी वडिलांच्या स्मरणार्थ या मार्गावरून जाणाऱ्या सर्वानाच केळी व मास्क चे वाटप करून , प्रवाशा मध्ये विठ्ठल पहिला.
लॉक डाऊन जाहीर झाल्या पासून पोलिस यांची भीती सर्वानाच वाटत होती,काठी चा प्रसाद देणारे हात मात्र, माऊली माऊली म्हणून केळी वाटप करत होते. या वेळी पो.ना.खामकर पो. कौ.जगताप,संजय काळे,आण्णा जगताप,सुगत वाघमारे,उपस्थित होते…






