कृष्णा जाधव यांना ‘अनागारिक धम्मपाल जीवन गौरव पुरस्कार’ तर एस. के. खैरे यांना ‘भदन्त आनंद कौसल्यायन जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
प्रतिनिधी राहुल खरात
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा श्रीवर्धनच्या विद्यमाने, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यान, पुण्यक्षेत्र भिक्खू संघाच्या वर्षावासानिमित्त, प्रवचन मालिकेचे आयोजन श्रीवर्धन तालुक्यातील संत रोहिदास हाॅल, श्रीवर्धन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रवचन मालिकेची सांगता रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय सचिव एम. डी. सरोदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमित्त साधून श्रीवर्धन तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेचे बिजारोपण करणारे तात्कालिन अध्यक्ष कृष्णा जानू जाधव यांना ‘अनागारिक धम्मपाल जीवन गौरव पुरस्कार’ आणि तात्कालिन सरचिटणीस एस. के. खैरे यांना ‘भदन्त आनंद कौसल्यायन जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. बुद्धरूप, मानपत्र, आणि एकविस हजार रूपये रोख रक्कम असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप होते.
या वर्षावासानिमित्त ज्या गावांमध्ये प्रवचन मालिका राबवण्यात आल्या त्या मौजे सायगाव, निगडी, जसवली, कपिलवस्तु नगर, श्रीवर्धन, चिखलप, वाळवटी या गावांचा तसेच ज्यांनी वैयक्तिकरित्या आपल्या घरी वर्षावास प्रवचनमालिका राबवली त्या सर्वांचा प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आले.
या समारंभात, रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष विजय जाधव, कोषाध्यक्ष शशिकांत पवार, माणगाव तालुका अध्यक्ष, म्हसळा तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, श्रीवर्धन शाखेचे माजी अध्यक्ष एम. डी. पवार, श्रीवर्धनचे माजी तहसिलदार भगत र. ना. राऊत हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक जोशी, भारिप बहुजन महासंघ तालुका अध्यक्ष प्रमोद पवार, ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष सुधीर पवार, नालासोपारा शहर अध्यक्ष आदेश मोहिते, विरार शहर अध्यक्ष किरण जाधव, प्रकाश तांबे, सुधाकर साखरे, चंद्रकांत हुंदिलकर, भिमराव सुर्यतल, नरेन्द्र शिर्के, गौतम वाघमारे, विक्रम येलवे, वसंत चाफे, अशोक सावंत, विजय येलवे, आयु. विलास चाफे, देवकांत तलाठी साहेब, सुनील गमरे, भिकूराम मोहिते, मोहिनी जाधव,जनाबाई तांबे तसेच श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावातील नागरीक उपस्थित होते. तर यावेळेस कार्यक्रमास सढळ हस्ते दान देणा-या दानदात्यांना सन्मान पत्र देउन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका शाखा श्रीवर्धन च्या अध्यक्षा अरूणाताई येलवे, सरचिटणीस संतोष मोहिते, कोषाध्यक्ष संदिप जाधव, मिलिंद जाधव, राजेश खैरे, गणेश खैरे, संदेश तांबे, मुंबई विभागाची संपुर्ण कार्यकारिणी आणि हितचिंतक यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रम यशस्वी केला.
