Amalner

?️अमळनेर कट्टा…जिवंतपणी विवंचना आणि मृत्यूनंतर विटंबना…!अमळनेर स्मशानभूमीत कुत्रे तोडतात मृतदेहांची लचके…

?️अमळनेर कट्टा…जिवंतपणी विवंचना आणि मृत्यूनंतर विटंबना…!अमळनेर स्मशानभूमीत कुत्रे तोडतात मृतदेहांची लचके…

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवल्याने प्रतिदिवस अनेक व्यक्ती मूत्यूमुखी पडत आहेत. सध्याच्या परिस्थितीत स्मशानभूमीत जागादेखील मिळत नाही अश्या परिस्थितीत अमळनेर शहरातील चोपडा रोड वर असलेल्या शनिपेठ भागातील स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यमुखी पडलेल्या मृतांचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यात अर्धवट जळालेले मृतदेह कुत्रांनी बाहेर काढून प्रेताचे लचके तोडत असल्याचा किळसवाना प्रकार सध्या अमळनेर शहरात पहावयास मिळत आहे.

अमळनेर शहरात सध्या कोरोना मृतांचा आकडा वाढत असल्याने स्मशानभूमीत अस्थीघेणाऱ्या लोकांना हाडे मिळत नाहीत. तसेच येथील स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य देखील खूप मोठ्याप्रमाणावर झाले असून पालिका प्रशासनाकडून कोणतीही साफ-सफाई येथे होत नसल्याने येथील नगरसेविका सौ.संगीता पाटील यांच्यासह १०३ स्थानिक रहिवासी ताडेपुरा,शनिपेठ ,पैलाड येथील नागरिकांनी शहराच्या अन्य स्मशानभूमीत प्रेतांची विभागणी करावी अशी मागणी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे करण्यात आली आहे. या बाबतीत वि.आ.अनिल पाटील यांनी न.पा. प्रशासनास तात्काळ नियोजित जागेची पाहणी करून कोरोना मृतांचे अत्यसंस्कार करण्यासाठी जागा तयार करून द्यावी व तसा बोर्ड लावून या बाबत प्रसार माध्यमातून लोकांना तशी माहिती पुरवण्यात यावी अशी माहिती देखील आ.पाटील यांनी दिली.

शहरातील अन्य स्मशानभूमीत पुरेशी सुविधा नसल्याने चोपडा रोड शनिपेठ येथील स्मशानभूमीत प्रेतांचा लोड वाढल्याने अस्थी घेणाऱ्या लोकांना अस्थी मिळत नाही तर अर्धवट जळालेल्या प्रेतांची लचके कुत्रे तोडत असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्याने अंत्यसंस्कार विविध स्मशानभूमीत करण्यात यावेत अशी मागणी पैलाड शनीपेठ , ताडेपुरा भागातील नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह सुमारे १०३ नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

पैलाड स्मशानभूमीत सुमारे दररोज १० ते १४ प्रेत अंत्यसंस्कारासाठी येत असल्याने परिसरात खाली जमिनीवर सुद्धा जागाउपलब्ध नाही त्यामुळे प्रेते पूर्ण न जळता अपूर्ण जळत आहेत त्यात काही कुत्रे प्रेतांची लचके तोडत आहेत आणि बाहेर रस्त्यावर घेऊन जात आहेत नातेवाईकांना त्यामुळे दुसऱ्या दिवशी अस्थी देखील मिळत नाहीत प्रेतांची विटंबना देखील होत आहे त्यामुळे अंत्यसंस्कार विभागले जाऊन सानेनगर,खळेश्वर,धार रस्ता या स्मशानभूमीत देखील अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात यावी त्या ठिकाणी पालिकेने लाकडांची व्यवस्था करण्यात यावी किंवा शहराबाहेर मोकळ्या जागेत अंत्यसंस्कारची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका संगीता पाटील , शिवसेना शहर प्रमुख संजय पाटील , प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार , नगरसेवक संजय भिल , नगरसेविका राधाबाई संजय पवार , नगरसेवक सुरेश आत्माराम पवार, रणजित रामचंद्र पाटील , अमरजीत पाटील , संजय नवल पाटील , विजय पाटील ,भटू फुलपगारे , विश्वजित पाटील , रवींद्र पाटील यांच्यासह १०३ लोकांनी आमदार अनिल पाटील ,प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , नगरध्यक्षा पुष्पलता पाटील , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांना निवेदना द्वारे केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button