Amalner

अमळनेरच्या मील कामगार हुतात्मेंना भाकप तर्फे मानवंदना हौतात्म्याचे 75वे स्मृती वर्ष कामगार कष्टकरी चेतना वर्षं पाळण्याचा निर्धार…

अमळनेरच्या मील कामगार हुतात्मेंना भाकप तर्फे मानवंदना हौतात्म्याचे 75वे स्मृती वर्ष कामगार कष्टकरी चेतना वर्षं पाळण्याचा निर्धार…

रजनीकांत पाटील

अमळनेर.. येथे 27आॅगष्ट 1946 रोजी प्रताप मील कामगारांच्या मोर्चावर गोरा डीएसपी डेव्हीड याने केलेल्या अमानुष गोळीबारातील.. हुतात्मा श्रीपत पाटील व 8सहकारी यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे स्मृती स्तंभा जवळ मानवंदना देण्याचा कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई चौकात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कामगार नेते काॅम्रेड अमृत महाजन व दैनिक लोकमत चे प्रेस फोटोग्राफर महेंद्र पाटील निमंत्रित होते त्यांनी त्यांचे हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

यावेळी कॉम्रेड श्रीपत पाटील अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक भाकपचे जेष्ठ नेते कॉम्रेड लक्ष्मण शिंदे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली व नगरपालिकेकडून अपेक्षा व्यक्त केली की, त्यांनी या स्मारक स्तंभाची दररोज साफसफाई करावी व स्मारक नुतनीकरण करण्यात यावे अमळनेर शहरातील नाव लौकीक वाढवावा . त्यानंतर काॅ महाजन यांनी सांगितले की, यावर्षी कॉम्रेड श्रीपत पाटील व 8कामगार हुतात्मे यांचा स्मृति 75 वे स्मृती वर्ष सुरू होत असून हे वर्ष *कामगार कष्टकरी चेतना वर्ष* म्हणून साजरे करण्याच्या निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक करीत आहे 27 ऑगस्ट 2020 ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत किमान पाच सभा अमळनेर शहरात घेणार असून या वर्षात जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते कामगार वर्गात काम करणारे तसेच जनतेचे नेतृत्व करणारे 100 जनांच्या मान्यवरांच्या आम्ही सन्मान करणार आहोत जळगाव जिल्ह्यातील कामगार संघटनेचा मेळावा अमळनेर येथे घेणार आहोत व त्यासाठी आयटकचे राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर.भाकपचे राष्ट्रीय नेते भालचंद्र कांगो. विद्यार्थी नेते काॅ कन्हैया कूमार.. तसेच. महाराष्ट्राचे कामगार मंत्री दिलीप सोपल अमळनेर.. तालुक्याचे आमदार अनिल पाटील .तसेच माजी आमदार साहेबराव पाटील व गुलाबराव पाटील आदी मान्यवरांना बोलणार आहोत ..या दृष्टिकोनातून एक कृती समिती तयार करण्यात येणार असून त्यात जिल्हा सेक्रेटरी कॉ ज्ञानेश्वर पाटील लक्ष्मण शिंदे, निर्मला शिंदे, उषा पवार , विरेंद्र पाटील, विश्वास पारधी ,चंद्रकांत माळी समावेश आहे राहणार आहे असे सांगितले..
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉंम्रेड ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण शिंदे ,निर्मला शिंदे, उषा पवार तसेच विजय पाटील ,गणेश पाटील ,पिंटू पाटील ,राजू पैलवान, राजू चांभार आदीं स्वयंस्फुर्त सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button