खाजगी पशुवैद्यकीय संघटना अमळनेर यांच्या वतीने सर्व कोरोना योद्धयांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार..
प्रतिनिधी : महेंद्र साळुंके
अमळनेर : आज दि.१०/११/२०२० वार मंगळवार रोजी सकाळी ११वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळ येथे कोरोना काळात सर्व डॉक्टर,आरोग्यकर्मचारी, आशास्वयंसेविका,आशा सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांचा म्हणजे जवळ जवळ१२५ महीला व पुरुषांचा कोरोना काळात चांगली सेवा केल्याबद्दल खाजगी पशुवैद्यकीय संघटना अमळनेर यांच्या वतीने सर्व कोरोना योद्धयांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करून सर्व गोष्टी अमलात आणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाय.आर.सूर्यवंशी व डॉ.एस.वाय.पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर प्रार्थमिक आरोग्य केंद्र मांडळ येथील डॉ. सागर पाटील,डॉ.भाविका पाटील,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.विकास मोरे, सुपरवायझर वैशाली ठाकरे, कल्पना ठाकूर(आशा सुपरवायझर),आरती राजपूत, सविता घुघे व डॉ.दिपक पंढरीनाथ पाटील(माजी.पं.स.सभापती अमळनेर) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिपक पाटील यांनी केले. त्यात त्यांनी संबंधित कोरोना योध्यानच्या बाबतीत बोलताना म्हटले की यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आज पर्यंत लोकडाऊनचा पिरियड कोरोना सारखी महामारी मध्ये मनापासून अतिशय उपयुक्त, उत्कृष्ट काम केले आणि आपली एक समाजा प्रती वेगळी ओळख निर्माण केली.त्या काळात संबंधित कोरोना योध्याना शारीरिक, मानसीक त्रास सहन करावा लागला तरी सुद्धा त्यांनी आपले काम प्रामाणिक पणे केले.म्हणून आम्ही आमच्या खाजगी पशुवैद्यकीय संघटनेने ठरविले की संबंधित या कोरोना योध्यानचा आपण सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले पाहीजे. म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या नंतर संबंधित कार्यक्रमात व्यासपीठावरील डॉ.सागर पाटील,वैशाली ठाकरे,कल्पना ठाकूर यांनी आपले अनुभव मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वाय.आर.सुर्यवंशी यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन पर भाषण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डिगंबर माळी शहापुर यांनी केले. आणि आभार प्रदर्शन डॉ.सोपान पाटील गडखांब यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांडळ प्रार्थमिक आरोग्य केंद्र मांडळ केंद्रातील कदम भाऊसाहेब, प्रतिभाताई, विशाल कोळी तसेच खाजगी पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील,उपाध्यक्ष डॉ.गुलाब वारुळे,डॉ.अजय साळुंखे,डॉ. संजय पाटील,डॉ.चंद्रकांत लोहारे,डॉ.सचिन पाटील,डॉ.गजानन चौधरी,डॉ.निलेश मोरे, डॉ.भुषण जोशी ,डॉ.शिवरत्न पाटील,डॉ.सुमित पाटील,डॉ.राजेंद्र बाविस्कर,डॉ.विवेक पाटील,डॉ.हृषीकेश पाटील, डॉ.विक्रांत पाटील इ.यांनी सहकार्य केले.






