संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी-साने गुरुजी जयंतीनिमित्त कोरोना काळातही-खाजगी शिक्षकाचा मोफत वैचारिक उपक्रम सुरू
1)महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांनी ऐकली होती श्यामची आई कथा-
महाराष्ट्राचे आवडते मातृहृदयी साने गुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत म्हणून एका खाजगी शिक्षकाने स्वतःच्या आवाजात साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातील 42रात्रींच्या गोष्टी ऑडिओ क्लिप करून सुमारे 500 शाळांना मोफत पाठवून रोज प्रार्थनेच्या वेळी त्या ऐकवल्या जात होत्या.
भैय्यासाहेब मगर सर अमळनेर येथे खाजगी साई इंग्लिश अकॅडमि,कोचिंग क्लासेस चालवत असून अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी असून राज्यातील मुलांना मातृहृदयी,मुला फुलांचे कवी, थोर लेखक,समाज सुधारक,स्वातंत्र्य सैनानी,
आदर्श शिक्षक कळावेत.सर्वच मुले महाराष्ट्राचे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र श्यामची आई हे पुस्तक वाचू शकत नाही किंवा एकाचवेळी उपलब्ध होऊ शकत नाहीत,म्हणून जर मुलांना एकाच वेळी ऑडिओ क्लिप ऐकवली तर सर्वाना एकाच वेळी ऐकता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजींचे विचार पोहचविता येतील म्हणून श्री.मगर सर यांनी स्वखर्चाने 42 रात्रीच्या कथेचे पुस्तक ऑडिओ क्लिप मध्ये रूपांतर केले आणि एक नव्हे तर तब्बल 500 पेक्षा जास्त शाळांना त्या क्लिप मोफत पाठविण्यात आल्या होत्या.अमळनेर तालुक्यातील 35 ते 40 शाळांमध्ये तर नाशिक,पुणे,मुंबई , धुळे,जळगाव,चाळीसगाव,चोपडा,पाचोरा,नगर , उस्मानाबाद ,नांदेड,जालना,सटाणा,अमरावती, हिंगोली,बिड आदी जिल्ह्यात,तालुक्यात शाळांमध्ये क्लिप पाठवल्या होत्या,आणि विशेष म्हणजे दररोज प्रार्थनेच्या वेळी परिपाठात एक कथा मुलांना या शाळांमधून ऐकवली जात होती.साने गुरुजी जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राज्यभरात अनेक ठिकाणी राबवला गेला.
गेल्या 21 वर्षांपासून सातत्याने गुरुजींचे विचारघराघरात ‘श्यामच्या आई’ या पुस्तकाच्या माध्यमातून भैय्यासाहेब मगर सर पोहोचवत आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन मुळे शाळा भरल्याच नाहीत परंतु ऑनलाईन च्या माध्यमातून गुरुजी घराघरात पोहोचवण्याचे कार्य भैय्यासाहेब मगर सर यांनी सुरूच ठेवले होते.मातृह्रदयी पुज्यनीय साने गुरुजी यांची जन्मभूमी जरी कोकण असली तरी कर्मभूमी मात्र अमळनेर !श्यामची आई या पुस्तकानं तर अवघ्या जगाला वेड लावलेलं.24 डिसेंबर हि साने गुरुजींची जयंती. दरवर्षी आपण यानिमित्त कोणत्या-ना-कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करतच असतो.आणि यावर्षी
एका अनोख्या पद्धतीने क्लासेस संघटनेच्या (PTA)माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकातील 42 रात्री(गोष्टी)पैकी विद्यार्थ्याला आवडणारी कोणतीही एक गोष्ट- स्टोरी टेलिंग (कथाकथन) च्या माध्यमातून 5 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून श्री.मगर सर यांच्याकडे पाठवायचा या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यातून प्रतिसाद मिळाला होता.स्पर्धा प्रमुख म्हणून हे कार्य करतांना व साने गुरुजींचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळात पोहचत आहे…हे पाहून भैय्यासाहेब मगर सर यांना मनस्वी आनंद झाला होता.
या वर्षी सुद्धा कोचिंग क्लासेस संघटना(PTA)अमळनेर तर्फे- पुन्हा एकदा स्पर्धा प्रमुख म्हणून भैय्यासाहेब मगर यांनी साने गुरुजी जयंती निमित्त- जिल्हास्तरीय स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचे ऑफलाईन आयोजन.(इ.5वी ते 12वी वर्गासाठी)
स्थळ-एम.जे.हॉल,अमळनेर येथे केलेले आहे.
संस्कारक्षम पिढी घडावी म्हणून गुरुजींचे विचार गावोगावी पोहचविण्याचे स्वस्त आणि उत्कृष्ट साधन म्हणजे श्यामची आई पुस्तकाची ऑडिओ क्लिप करणे होते. विद्यार्थी वाचन करण्याचा कंटाळा करतात म्हणून श्रवणाच्या माध्यमातून गुरुजी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.-भैय्यासाहेब मगर सर
संचालक-साई इंग्लिश अकॅडमि,अमळनेर






