India

आरोग्याचा मुलमंत्र..त्वचा रोग व त्या संबंधी काळजी

आरोग्याचा मुलमंत्र..त्वचा रोग व त्या संबंधी काळजी

आपण आपल्या शरीरावरील फंगल इन्फेक्शन कडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचे रूपांतर नायटा, खरुज, गजकर्ण यामध्ये होते. आज-काल याचे प्रमाण इतके वाढले आहे की दहापैकी चार लोकांना ही समस्या पाहायला मिळते.

त्वचारोग ही एक कॉमन समस्या आहे. अनेक लोक ह्या समस्येने ग्रस्त असतात.

त्वचारोगाच्या अनेक प्रकारांपैकी गजकर्ण, खरूज आणि नायटा हे सामान्यपणे आढळतात.

आज आपण गजकर्ण म्हणजे काय, हे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय काय ते जाणून घेऊया.

गजकर्ण हे त्वचेच्या वरच्या भागात होते. वैद्यकीय परिभाषेत गजकर्णाला टिनीया असे म्हणतात. हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला अगदी सहजपणे होतो.

गजकर्ण झाला की त्वचेवर एक गोलाकार लाल रंगाचा चट्टा उमटतो. ह्या चट्टयाला खूप खाज सुटते आणि तिथे आग आणि वेदना होतात.

गजकर्ण झाला असता त्वचेच्या त्या भागाला खाज येते हे प्रमुख लक्षण आहे. त्याशिवाय

त्वचेच्या त्या भागाची आग होणे.

त्वचेवर लाल रंगाचा चट्टा दिसून येणे.

त्वचेवरील चट्टा गोल असून त्याच्या कडा लाल आणि पुरळ असलेल्या असणे.

गजकर्ण मुळात होऊच नये ह्यासाठी आपण आपल्या आहार आणि जीवनशैली मध्ये काही बदल करू शकतो.

आहारात खालील पदार्थांचा समावेश केला तर fungal इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

व्यसन टाळावे-
अतिरिक्त प्रमाणात गोड, तिखट, मसालेदार पदार्थ, जंक फूड, मद्यपान धूम्रपान इत्यादि करू नये.

लवंग-
लवंग खाण्यामुळे देखील fungal इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

हळद–
हळद हे नॅच्युरल अँटी बायोटिक आहे. हळदीमध्ये पाणी मिसळून ते मिश्रण कापसाच्या सहाय्याने गजकर्ण झालेल्या ठिकाणी लावावे. हा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे

नारळाचे तेल–
त्वचाविकारावर नारळाचे तेल अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. शिवाय इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. म्हणून गजकर्ण झालेल्या ठिकाणी नारळाचे तेल लावावे.

कोरफड–
त्वचेसाठी कोरफडीचा चिक देखील अत्यंत गुणकारी आहे. गजकर्ण झालेल्या ठिकाणी रात्रभर कोरफडीचा चीक लावून ठेवावा. ह्यामुळे गोल चट्टा बरा होण्यास तसेच येणारी खाज कमी होण्यास मदत होते.

कडुलींब–
कडुलींबाची पाने अंघोळीच्या गरम पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करण्यामुळे त्वचारोग बरे होतात.

पण लक्षात ठेवा की हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. आणि ह्याचे प्रमाण जर वाढले तर त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणून वरील उपचार करून सुद्धा बर वाटत नसेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button