भिवंडी

ग्रामविकास युवा प्रतिष्ठान संस्था पिंपळास आणि पिंपळास ग्रामस्थ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

ग्रामविकास युवा प्रतिष्ठान संस्था पिंपळास आणि पिंपळास ग्रामस्थ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

भिवंडी प्रतिनिधी
मिलिंद जाधव

भिवंडी तालुक्यातील
पाच्छापूर केंद्रातील जिल्हा परिषद शिरोळे व बासे शाळेत मुलांना ग्रामविकास युवा प्रतिष्ठान संस्था पिंपळास आणि पिंपळास ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले व परिसरात स्वच्छता अभियान राबिवण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोबल व कला, सांस्कृतिक जीवन उंचविण्यासाठी शिरोळे शाळेतील नम्रता विलास घोडविंदे,मनस्वी साईनाथ ठाकरे, तर जिल्हा परिषद बासे शाळेतील तनया रवींद्र पडवळ, निधी मनोज देसले या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधानावर भाष्य केले. तर यावेळी ग्रामविकास युवा प्रतिष्ठान संस्था पिंपळास आणि पिंपळास ग्रामस्थ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या ,पेन पेन्शील, रबर , शॉपनर, कलर पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामविकास युवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष दिलीप जाधव,संथापक सुधाकर पाटील, उपाध्यक्ष योगेश पाटील, सरपंच पूनम गोंड, उपसरपंच चित्रा मते, भिवंडी तालुका श्रमजीवी अध्यक्ष,सुनील लोणे, शाळा समिती अध्यक्ष प्रविण मानकर, चंद्रकांत मते,महेश बराडे, संस्थेचे सचिव संदेश कोली, सल्लागार परेश पाटील, सदस्य चेतन कोळी, सागर पाटील, सुभाष म्हस्के, प्रभाकर मढवी,विजय पाटील उपस्थित होते. तसेच शिक्षक अश्विन पाटील,अपर्णा देशमुख ,रेखा जंगम, सई पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button