Pandharpur

सोलापूर सोशल फाउंडेशन चा लॉकडाऊन च्या काळात ग्रामीण भागातील पत्रकारांना मदतीचा हात…

सोलापूर सोशल फाउंडेशन चा लॉकडाऊन च्या काळात ग्रामीण भागातील पत्रकारांना मदतीचा हात…

प्रतिनिधी रफिक आतार

सोलापूर जिल्ह्यातील विविध घटकांना सोबत घेवुन सोलापूर जिल्ह्याचे उत्पादित मालाचे ब्रँडिंग मार्केटिंग करत जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिल्या पाच क्रमांकाच्या यादीत आणण्याकरिता कार्यरत असणाऱ्या सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून फाऊंडेशनचे संस्थापक माननीय सुभाष बापू देशमुख यांनी covid-19 संसर्गजन्य रोग असल्यामुळे शासन प्रशासनाच्या सूचना त्याचबरोबर अटी व नियम यांचे पालन करण्यासाठी आवाहन केले. वेगवेगळ्या व्यवसायिक व त्यांच्या अडचणी बाबत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद सेतू च्या माध्यमातून संवाद साधला. त्यामध्ये शेतकरी, भाजीपाला- फळे उत्पादक, द्राक्ष-डाळिंब – रेशीम उत्पादक आणि सलून- लॉन्ड्री व्यवसायिक, फोटोग्राफर, वारकरी,डॉक्टर वकील, अभियंते ,सीए, आशा वर्कर, गारमेंट व टेक्सटाईल सह MIDC मधील कंपनी मालक यासह समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाज घटकांशी संवाद साधत असताना पत्रकारांशी देखील संवाद साधला. ग्रामीण भागातील पत्रकार म्हणजे तालुका अथवा ग्रामीण क्षेत्रातील व्यवसायांच्या जाहिराती किंवा काही बातम्यांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह भागविणारे अनेक पत्रकार बंधु या काळात अनेकांचे व्यवसाय बंद होत असल्यामुळे ते देखील अडचणीत आले होते.

संवाद सेतूच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आर्थिक अडचण, बँक हप्ते, व्याज माफी, विमा संरक्षण इत्यादी अनेक बाबतीत मागणी केली. अशावेळी सोलापूर सोशल फाउंडेशन ने पत्रकारांच्या तालुकास्तरीय संघटना/ संस्था यांच्‍याशी संपर्क साधून त्यांचेकडून गरजू व गरीब पत्रकारांची अधिक माहिती मागवून घेतली आणि त्यांना खात्यावर थेट आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या खात्यावर ही त्वरित आर्थिक मदत पाठविण्यात आली. त्याचबरोबर काही पत्रकारांनी मागणी केलेली विमा संरक्षण साठी अधिक माहिती घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे.
अनेक पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच सोलापूर सोशल फाउंडेशन ला फोन करून फाऊंडेशनचे आणि बापूंचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button