Maharashtra

शेतकरी हित साधणारे प्रा.सुभाष जिभाऊ

शेतकरी हित साधणारे प्रा.सुभाष जिभाऊ

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जळगाव जिल्ह्यात एकूण 208 कोटी 35 लाख रु पैकी अमळनेर तालुक्यातील 24800 व पारोळा तालुक्यातील 5290 शेतकऱ्यांना 63.86 कोटी रु सर्वाधिक पीक विमा चा लाभ शासना कडून मिळवून देणारे यात आपल्या शिरूड गावाला सुमारे 1 कोटी रु मिळवून शेतकरी हित साधणारे प्रा. सुभाष सुकलाल पाटील (जिभाऊ) हे एकमेव शेतकरी नेते निघाले. यासाठी त्यांना आमदार मा.अनिलदादा पाटील याचे सहकार्य लाभले.शेतकरी हित साधणारे प्रा.सुभाष जिभाऊजिभाऊंकडे प्रचंड इच्छाशक्ती, उच्च शिक्षणाची जोड कामी येत आहे. उच्च शिक्षणातून समाजहित चांगले साधता येते याची साक्ष यानिमित्त झाली. मनामध्ये चांगली भावना, विचार आले तर खूप चांगले काम करता येते. प्रा. सुभाष जिभाऊं चे विचार निश्चितचं समतावादी, विज्ञानवादी बहुजन हिताय – बहुजन सुखाय आहे. याची प्रचिती आम्हाला त्यांच्याशी सुसंवाद साधतांना येत राहते.शिरूड गावाचे, परिसराचे, तालुक्यातील जनतेचे कसे भले होईल याचा विचार सातत्याने जिभाऊंकडे येत असतात. यावरुन त्यांचे व्यक्तिमत्त्व हे समाजहित जपणारे आहे हे निश्चित होते. युवकांना प्रेरणा मिळेल असाच संवाद जिभाऊंचा असतो. शिरूड गावात कोणताही सुख दुःख चा प्रसंग असो किंवा कार्य असो अश्या वेळी आपली उपस्थिती देऊन मदत व सहकार्य करणारे प्रा. सुभाष पाटील आहेत. त्यांनी सार्वजनिक जीवनात, कार्यात कोठेही चांगल्या कामासाठी माघार घेतलेली दिसून येत नाही. ते शाळेचे असो किंवा गावाचे. असे उमदे व्यक्तिमत्त्व आम्हाला आमच्या शिरूड गावाला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तूर्त एवढेच…
-कुणाल शिरूडकर, अमळनेर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button