Maharashtra

निलंगा पोलिसांकडून झोपडीत राहणाऱ्या लोकांना तांदूळ, बिस्कीट वाटप.

प्रतिनिधी सलमान पठाण

निलंगा पोलिसांकडून झोपडीत राहणाऱ्या लोकांना तांदूळ, बिस्कीट वाटप.

निलंगा:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका अशा झोपडीत राहणाऱ्या लोकांना बसला आहे. या लोकांना मजुरी व पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने सद्यस्थितीला त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, यांनी या झोपडीत राहणाऱ्या गरीब लोकांची दखल घेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 125 किलो तांदूळ व बिस्कीट खरेदी करून अशा लोकांना वाटप केले.

निलंगा येथील बँककॉलनी रोड लागत असलेल्या मोलमजुरी करून झोपडीतील व उदगीर मोडवरील झोपडीत राहणाऱ्या भीक मागून आपली उपजीविका भागवणाऱ्या गरीब भटक्या समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात निलंगा शहरात वास्तव्य करून राहतात. जगासह देशात कोरोना या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून.

शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या झोपडपट्टीतील व भीक मागून आपली उपजीविका भागवणाऱ्या लोकांची मोठी हाल होत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणुसकीची भावना जोपासत झोपडीतील गरीब लोकांन निलंगा पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, शितलकुमार सिंदाळकर, बाळासाहेब नागमोडे, प्रणव काळे यांनी तांदूळ व बिस्कीट देऊन मदत केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button