Asia Cup 2022: आशिया चषक 2022 ची तारीख जाहीर झाली असून असं आहे वेळापत्रक संघ आणि कुठे पाहू शकाल..!
आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्ट रोजी दुबई येथे सामना होणार आहे. आशिया चषकात जसप्रीत बुमराह नाहीये पण असं असूनही भारताकडे अनेक आक्रमक गोलंदाज आहेत.
टी-२० फॉरमॅटमध्ये गोलंदाजाच्या कोट्यात जास्तीत जास्त चार षटके असतात. पण कोणत्याही एका गोलंदाजाची चार षटके सामन्याचे फासे फिरवण्यास पुरेशी ठरतात. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळत नाही, परंतु असं असूनही भारताकडे २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करण्यास सक्षम गोलंदाज आहेत.
२७ ऑगस्ट श्रीलंका वि. अफगाणिस्तानबदुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
२८ ऑगस्ट भारत वि. पाकिस्तानअदुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई७.३० रात्री
३० ऑगस्ट बांगलादेश वि. अफगाणिस्तान शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजा ७.३० रात्री
३१ ऑगस्ट भारत वि. टीबीसी अदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
१ सप्टें श्रीलंका वि. बांगलादेशबदुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
२ सप्टें पाकिस्तान वि. टीबीसीअशारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजा७.३० रात्री
३ सप्टें टीबीसी वि टीबीसी सामना १ (ब१ वि. ब२)सुपर फोरशारजाह क्रिकेट
स्टेडियम, शारजा ७.३० रात्री
४ सप्टें टीबीसी वि टीबीसीसामना २ (अ१ वि. अ२)सुपर फोरदुबई आंतरराष्ट्रीयक्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
६ सप्टें टीबीसी वि टीबीसीसामना ३ (अ१ वि. ब१)सुपर फोरदुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
७ सप्टें टीबीसी वि टीबीसी सामना ४ (अ२ v ब२)सुपर फोर दुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
८ सप्टें टीबीसी वि टीबीसी सामना ५ (अ१ वि. ब२)सुपर फोरदुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
९ सप्टें टीबीसी वि टीबीसी सामना ६ (ब२ वि. अ२)सुपर फोरदुबई आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
११ सप्टेंटीबीसी वि टीबीसी, अंतिमदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ७.३० रात्री
आशिया कप २०२२ संघ
भारत: रोहित शर्मा (क), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद् चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
राखीव: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.
पाकिस्तान:
बाबर आझम (सी), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.
- बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वरची जबाबदारी वाढली
भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारची जबाबदारी वाढलेली असेल. पहिल्या षटकात फलंदाज आक्रमक खेळत असो किंवा शेवटच्या षटकांमध्ये धावा रोखणे असो. दोन्ही बाबतीत भुवनेश्वरला कोणीही हारवू शकत नाही.
- हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आक्रमक दिसेल
हार्दिक एक दमदार फलंदाज आहे. पण गोलंदाजी हा त्याच्या खेळाचा यूएसपी आहे. दुखापतीमुळे बराच काळ तो गोलंदाजी करू शकला नाही. मात्र, आता त्याने गोलंदाजीला पु्न्हा सुरूवात केली आहे. तो आधीपेक्षा जास्त आक्रमक खेळताना दिसत आहे.
- डावखुरा अर्शदीप सिंग चमत्कार करेल
भारतीय गोलंदाजीतील सर्वात कमी अनुभवी गोलंदाज, पण शेवटच्या षटकांमध्ये अर्शदीप पाकिस्तानी फलंदाजांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकतो. त्याने आयपीएलमधील दबावाने भरलेल्या सामन्यांमध्ये अनेक बड्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती तो उद्याच्या सामन्यात करू शकतो.
- युझवेंद्र चहल आपल्या फिरकीत विरोधकांना अडकण्यासाठी सज्ज
उत्तम फिरकीपटू युझवेंद्र चहल हा पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात खेळला नाही. कारण त्याला विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण हा आक्रमक फिरकी गोलंदाज यावेळी पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
- रवींद्र जडेजा करेल आपल्या तुफान गोलंदाजीचे दर्शन
रवींद्र जडेजा हा एक उत्तम डावखुरा फिरकी गोलंदाज. वेगवान षटके टाकणे ही त्याची गुणवत्ता आहे. जडेजासाठी खेळपट्टी चांगली मिळाली तर फलंदाजांचं काही खरं नाही. जडेजा हा मैदानावर नेहमीच आत्मविश्वासात दिसतो, त्याचा हाच विश्वास पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचा ठरू शकतो.
-
आशिया कप २०२२ थेट प्रक्षेपण आणि थेट प्रवाह तपशील
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हे भारतातील स्पर्धेचे अधिकृत प्रसारक आहे. Disney+ Hotstar लाइव्ह स्ट्रीमिंग सादर करेल.






