Baramati

बारामतीत कोरोनासाठी होणार अक्टिव्ह सर्व्हे

बारामतीत कोरोनासाठी होणार अक्टिव्ह सर्व्हे

प्रतिनिधी- आनंद काळे

बारामती -बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्याचा उद्देशाने काही गावात अक्टिव्ह सर्व्हे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.माळेगाव, गुनवडी व पणदरे या तीन गावात येत्या सोमवारी ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
या मोहिमेसाठी तिन्ही गावाच्या सीमा सील करण्यात येणार आहेत.गावात कोणाला येता येणार नाही किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत कोणाला गावाच्या बाहेर जाता येणार नाही. या मोहिमेसाठी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी राहुल काळभोर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांच्या पुढाकाराने होणार आहे.
या मोहिमेत माळेगावमधील पाच हजार कुटुंब,गुणवडीतील 1400 व पणदरे मधील 1700 कुटुंबाचे ऑक्सिजन लेव्हल व थर्मल स्कॅनर तपासणी होणार आहे.या तपासणीत सापडणाऱ्या रुग्णाची लगेच रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात येणार आहे.या तीनही ठिकाणी सोमवारपुरते तात्पुरते कोविड केअर सेंटरही उभारले जाणार आहे.सकाळी सात ते बारा या वेळेत हा सर्व्हे होईल.त्यासाठी माळेगावसाठी 92,गुणवडीसाठी 25 तर पणदरे गावासाठी 27 पथके तयार केली आहेत.या पथकात दोन सरकारी कर्मचारी व एक स्वयंसेवक असे तीन जण असतील.प्रत्येक पथकाकडे 50 कुटुंबाची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button