Amalner

Amalner: दाऊदी बोहरा समाजातर्फे ईद ए मिलन कार्यक्रम जमात खाना येथे संपन्न..

Amalner: दाऊदी बोहरा समाजातर्फे ईद ए मिलन कार्यक्रम जमात खाना येथे संपन्न..

अमळनेर दाऊदी बोहरा समाज अमळनेरतर्फे ईद-ए-मिलनाच्या कार्यक्रम
जमातखाना येथे संपन्न झाला. याप्रसंगी अनेक समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व अनेक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, खा.शी.चे संचालक डॉ.अनिल शिंदे, ऍड विंचुरकर, अॅड. महेश बागुल, विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्याम पाटील, रोटरी क्लबचे सुहास राणे, चेलाराम सैनानी, डॉ. अनिल वाणी, डॉ. शरद बाविस्कर, अभिजीत भांडारकर, महेश पाटील, सुबोध पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय शुक्ल व सुनील वाघ, ग्राहक फाउंडेशनचे हेमंत दादा भंडारकर, एम एस ई बी चे इंजिनिअर उज्ज्वल पाटील, नगरसेवक मनोज पाटील, मुन्नाभाऊ शर्मा, राजू चौधरी, बाळा संनदाशिव, पंकज चौधरी, न. पा. प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सोमनाथ संनदाशिव, पत्रकार चेतन राजपूत, किरण पाटील, सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार प्रा.जयश्री साळुंखे-दाभाडे, राजश्री पाटील, भैरवी पलांडे यासह नावेद शेख, मकसूद मिस्त्री, रफिक तेली, राजू भाई, फारुख भाई, फैयाज सर इक्बाल भाई, एहतेशाम भाई, डॉ रईस बागवान इ उपस्थित होते.

बोहरा समाजामध्ये तर्फे व्हॉइस प्रेसिडेंट शेख एहसान भाई बुरहानी, सेक्रेटरी शेख मोहम्मद भाई करमपुरवाला ट्रेझरर शेख अलीहुसेन भाई सैफी व समस्त
कार्यकारी मंडळ उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होणे करिता बुरहानी गार्ड्स
इंटरनॅशनल कॅप्टन ताहा बुकवाला, व्हाईस कॅप्टन अजिज बोहरी, हुसेन बोहरी, अब्दुल कादीर जावेद, हुसेन सैफी, हुजेफा ईज्जी, अब्दुलकादीर भाई, मुस्तफा भाई, आली अजगर बोहरी, शब्बीर हुसेन, अलीअजगर अलाबक्ष आदींनी प्रयत्न केले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मकसूद बोहरी यांनी केले.

अमळनेर शहरातील दाऊदी बोहरा समाजाचे अमील साहेब यांनी विविधतेत एकता ही आपल्या भारत देशाची उज्वल परंपरा आहे व ती टिकून आहे. असे मत व्यक्त केले.आमदार अनिल पाटील यांनी आपले अमळनेर शहर हे शांतता प्रिय आणि जातीय सलोखा येथे जोपासला जातो ही आपल्या संत नगरीची विशेष बाब आहे. अॅड. ललिता पाटील यांनी आपल्या मनोगतात पवित्र रमजान महिन्याचे व इस्लाम धर्माबद्दलचे अभ्यासपूर्ण भाषण केले. दारूलउलुमचे रियाज मौलाना यांनी रमजान महिन्यात अदा करण्यात येणारी जकात व फित्रा बद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button