?️ Breaking News अमळनेर येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग तर्फे दारू दुकानांवर तपासणी सुरू….
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील ठिक ठिकाणी सुरू असलेल्या दारू,वाइन इ दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार शहरातील विविध दारू,वाईन, बिअर दुकानांची तपासणी सुरू आहे.
यात बाजार पेठेतील बिअर शॉप यांचे दारू दुकान तसेच भरूचा वाइन शॉप याठिकाणी सध्या तपासणी सुरू असून अहवाल,माल तपासला जात आहे.स्टॉक आता पर्यंत झालेली विक्री,खरेदी इ ची तपासणी केली जात आहे.
सध्या भुसावळ, जळगांव, चाळीसगाव येथून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विविध अधिकारी या साठी आले आहेत. रात्री उशिरा पपर्यंत ही तपासणी सुरू होती.






