Latur

लातुर जिल्हातील सर्व ग्रामपंचायत च्या निवडणुकीवर बंदी घालण्यात यावी : भाग्यश्री कांबळे

लातुर जिल्हातील सर्व ग्रामपंचायत च्या निवडणुकीवर बंदी घालण्यात यावी : भाग्यश्री कांबळे

लक्ष्मण कांबळे लातूर

लातूर : औसा तालुक्यातील अजब गजब प्रकार
महाराष्ट्रातील ग्रामपंचयाच्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर होताच गावोगाव च्या ग्रामपंचायत ह्या आपल्याच ताब्यात राहाव्यात म्हणून गाव पुढारी व तरुणांनी कंबर कसून ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवली असता औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील भाग्यश्री लक्ष्मण कांबळे या अनुसूचित जाती वॉर्ड क्रमांक एक(१) या महिला राखीव असलेल्या जागेतून निवडनुक लढवण्या करीता औसा तहसील कार्यालयात गेले असता कर्नाटकातील जातीच्या दाखल्यावरून महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही म्हणत भाग्यश्री कांबळे हिचा अर्ज नाकारण्यात आला .हा निवडणूक विभागाचा जातीय वादी द्वेषातून केलेला मागासवर्गीय महिलेवर एक प्रकारचा घनघोर अन्याय आहे
भारतीय संविधानात भारतातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा जन्मजात अधिकार दिलेला तसेच भारतीय नागरिकाला कुठून ही कुठेही निवडणूक लढवता येते असे असताना ही निवडणूक विभागाचा जातीवादी विरोध का? ही जाचक अट रद्द करून कर्नाटकातील व इतर राज्यातील मागासवर्गीय असलेल्या महिलना निवडणुक लढवण्याची मुभा देण्यात यावी
इतर राज्यातून आलेल्या महिलेचे मतदान चालते तर मग निवडणूक का नाही?
याचा निकाल जोपर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांवर बंदी घालण्यात यावी
असे प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी याच्याशी बोलताना भाग्यश्री कांबळे म्हणाल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button