Rawer

? खळबळ जनक :रावेर जवळ असलेल्या बोरखेडा शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या..नाशिक आय जी दौऱ्यावर..थोड्याच वेळात पोहचतील रावेर…

खळबळ जनक :रावेर जवळ असलेल्या बोरखेडा शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या

प्रतिनिधी भिमराव कोचुरे

सविस्तर वृत्त असे की, रावेर येथून जवळच असलेल्या बोरखेडा शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा निंदनीय प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून या चारही भावंडांच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या मध्ये मुलींचा समावेश आहे. घटना स्थळी रावेर पोलिसांचा ताफा दाखल झालेला आहे. सुत्रां कडून मिळालेली माहिती अशी बोरखेडा शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी व दोन मुली तसेच तीन मुलां सोबत राहतात.मध्य प्रदेशात त्यांचे नातेवाईक राहत असल्याने . नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दश क्रिया विधी साठी पत्नी व मुलासह मध्य प्रदेशात १५ ऑक्टोंबर रोजी गेले होते.दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते चारही भावंडांनी जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची निर्घृण हत्या केली शेत मालक शेख मुस्ताक हे सकाळी शेतात आले असता त्यांना घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता चारही मुलांचे मृतदेह व रक्ताचा सडा दिसून आला.हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलिसांना घटनेची माहिती दिली मयतामध्ये दोन मुलींचा समावेश आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटना स्थळी धाव घेतली आहे.यावेळी पोलीस निरीक्षक. रामदास वाकोडे, सपोनि. शितल कुमार यांच्या सह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे.नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्यापही कळू शकले नाही. सदर गुन्हा तपास कामी श्वान पथक मागविण्यात आले असून तपास जलद गतीने सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button