Maharashtra

फॅबटेक शुगर च्या मिल रोलरचे पुजन

फॅबटेक शुगर च्या मिल रोलरचे पुजन

प्रतिनिधी रफीक आत्तार

मंगळवेढा गळीत हंगाम 2020-21 साठी फॅबटेक शुगर शुगरचे मिल रोलर पूजन मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवताडे व स्पार्कन इंजीनियरिंगचे संचालक दिपक रुपनर यांचे शुभहस्ते धार्मिक विधी करून पूजन करण्यात आले. तसेच चेअरमन सरोज काझी यांचे हस्ते पहिला वाहन करार करून तोडणी वाहतुकीचा कराराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय माने व बापू काकेकर मंगळवेढा मार्केट कमिटीचे तज्ञ संचालक सत्यजित सुरवशे यांची प्रमुख उपस्थिती होती संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमचे मार्गदर्शक समाधान (दादा) आवताडे व सांगोला तालुक्याचे शिवसेना नेते व मार्गदर्शक भाऊसाहेब रुपनर यांचे मार्गदर्शनानुसार कारखान्याची ओव्हर ऑईलिंगची कामे गतीने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मिल रोलरचे पूजन करून सुरुवात केली आहे गेल्या गळीत हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची कमतरता असूनही कारखान्यांने शेतकऱ्यांचे विश्वासावर चांगले गाळप केले गळीत हंगाम 2020- 21 हा लवकर चालू करण्याच्या दृष्टीने कारखान्याची पूर्वतयारी चालू असल्याबाबतची माहिती सरोज काझी यांनी दिली.यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे, कात्राळ व कर्जाळचे उपसरपंच जकराया नरुटे, चीफ इंजिनियर किशोर फरांदे, चिफ केमिस्ट मोहन पवार व चंद्रकांत विभुते, डिस्टिलरी मॅनेजर चेतन काळे, वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे, ऊस विकास अधिकारी रामदास शिंदे, ऊस पुरवठा अधिकारी उत्तम ढेरे व दशरथ रोकडे, वाहन मालक शाहीर ताड, माणिक डोळस, धनाजी ताड, संजय माने, डम्पिंग व बैलगाडी मुकादम रामदास सानप, किसन सांगळे, मच्छिंद्र गोल्हार, तात्यासाहेब कंठाळे, गिज्ञानदेव नागरगोजे, अधिकारी व कर्मचारी हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button