Motha Waghoda

गावाचे टिप…नाव अनेक वर्षांपासून वाघोदा हे गाव विनाफलक…. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांनी स्वखर्चाने बसविले फलक…..

गावाचे टिप…नाव अनेक वर्षांपासून वाघोदा हे गाव विनाफलक…. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांनी स्वखर्चाने बसविले फलक…..


प्रतिनिधी : मुबारक तडवी मोठा वाघोदा

मोठा वाघोदा हे गाव बर्हाणपुर अंकलेश्वर महामार्गावर आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे 12 हजाराच्या आसपास असुन हा संपूर्ण परीसर केळीसाठी प्रसिद्ध असून या गावाशी लोकांचा प्रवाशांचा संपर्क येत असतो. पण या गावाला नाव फलकच नसल्याने नवख्या प्रवाशांना नेमके हे गाव कोणते आहे हेच कळत नव्हते.तसेच आलेल्या पाहुण्यांना प्रवास करतांना वाहनात बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला मनात विचार करायला भाग पाडत होते कारण बस स्टँड वर असलेल्या मोठ्या डौलदार वड या गावाची शान व त्याखाली असलेल्या प्रवाशांसाठी सुविधा बसण्याची व्यवस्था पण हे नेमके गाव कोणते हाच प्रश्न उभा राहत.होता. कित्येक वर्षापासून वाघोदा गावाला बसस्टँण्ड वर गावाच्या नावाचा बोर्ड नव्हता त्यामुळे गावाची ओळख दाबली जात होती. याकडे सर्वाचेच दुर्लक्ष होत होते..गावातील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांनी त्यांच्या स्वखर्चाने या गावाला नावाची ओळख दिली त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे असे नवीन नवीन विचार व नवीन नवीन उपक्रम राबवत असल्यामुळे कमलाकर माळी व गावकर्‍यांची गाठ चांगलीच घट्ट होत आहे.व सर्वदूरुन त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button