Dhule

धुळे शहर देवपूर भागातील नागरिकांची तक्रार महाराष्ट्रजीवन प्राधिकरण आणि धुळे मनपा व सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार फारूक शाह यांची पाहणी…. खोदलेल्या रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा आमदार फारूक शाह यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना…

धुळे शहर देवपूर भागातील नागरिकांची तक्रार महाराष्ट्रजीवन प्राधिकरण आणि धुळे मनपा व सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार फारूक शाह यांची पाहणी…. खोदलेल्या रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा आमदार फारूक शाह यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना…

असद खाटीक धुळे

यासह सर्व धुळे शहरातील नविन अपग्रेड सिग्नल यंत्रणा होणार कार्यान्वित आमदार फारूक शाह यांची माहिती…

धुळे : धुळे शहरातील अमृत योजने अंतर्गत भुयारी गटारीचे काम सुरु आहे. सदरचे काम अहमदाबाद येथील कंपनीला दिलेले आहे. देवपूर भागात अनेक प्रमुख वसाहतींमध्ये ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी होत्या. याबाबत आज धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि धुळे महानगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांसोबत ठेकेदारासह देवपुरातील दत्त मंदिर, वाडीभोकर रोड, जयहिंद महाविद्यालय यासारख्या प्रमुख भागात आज पाहणी केली. यावेळी वेळकाढूपणा करत असलेल्यांवर आमदार शाह यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या भावना समजून घ्या आता रस्ते खोदणेबंद करा आणि आधी एक महिन्यात खोदलेल्या रस्त्यांचे काम पूर्ण करा मगच काम करा असे आदेशित केले. दत्त मंदिर येथे मागील महिन्यात पाहणी केली असतांना त्यावेळी आमदार शाह यांनी धुळे शहरातील सिग्नल यंत्रणेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात चाळीसगाव चोफुली, दत्त मंदिर, कमलाबाई शाळा, कराचीवाला खुंट, प्रकाश टाकीज व इतर ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे सांगितले होते त्याच अनुषंगाने येत्या ५ दिवसात नवीन दर्जाची डीजिटल सिग्नल यंत्रणा सुरु करण्याचे ही आदेश शहराचे आमदार फारूक शाह यांनी धुळे मनपाचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. एन. के. बागुल यांना दिले.

पाहणी दरम्यान आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला काही महत्वाच्या सुधारणा आणि सूचना देखील सूचविल्या. या पाहणी दौऱ्याप्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या समवेत धुळे मनपाचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कैलास शिंदे, श्री. एन. के. बागुल, म.जि.प्रा. चे सहाय्यक अभियंता श्री. एस.एस. धोत्रे, श्री. आर. टी. जगताप, एन.पी. पटेल कंपनीचे श्री. हितेश पटेल, श्री. योगेश पाटील, श्री. निलेश काटे, श्री. आसिफ शाह आदींसह विविध विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button