? Big Breaking..कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..प्रवाश्यांना करावी लागेल SOP चाचणी..
देशातील काही राज्यांमधून हवाईमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना SOP लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. देशभरातील दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
काय आहे SOP
प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजे त्यांना करोना टेस्ट बंधनकारक आहे.महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी ही करोना चाचणी करावी लागणार.आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल तर विमानतळावर स्वखर्चाने कोरोना चाचणी करावी लागणार. चाचणीनंतर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती प्रवाशाकडून घेतली जाईल.
ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने प्रवाशांना SOP लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.






