Faijpur

भारताला विश्वगुरू बनविण्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग्य पाऊल – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

भारताला विश्वगुरू बनविण्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग्य पाऊल – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

सलीम पिंजारी फैजपूर

34 वर्षानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अमुलाग्र बदल करून नव्या भारताला आवश्यक असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला विश्वगुरू होण्यासाठी आगामी काळात अत्यंत फायदेशीर ठरणार असून प्रत्येकाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची इतंभूत माहिती मिळवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत यातील महत्त्वाच्या बाबी प्रसारित केल्या पाहिजेत. विशेषतः राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून सर्वच कॅडेटसने आपल्या परीजनांसोबतच परिसरातील सर्वानाच या धोरणाची माहिती द्यावी असे आवाहन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.

18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन व धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर वेबिनार चे यशस्वी आयोजन केले.

मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार व डायरेक्टरेट जनरल एनसीसी दिल्ली यांच्या आदेशान्वये दिनांक 14 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2020 यादरम्यान नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर जनजागृती होण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून धनाजी नाना महाविद्यालयात एनसीसी कॅडेटस साठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

यात एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर इथंभूत माहिती सादर करीत प्रत्येक एनसीसी कॅडेटने सोशल मीडियाच्या माध्यमातून अथवा शक्य असल्यास आपल्या परीजनांपर्यंत व परिसरातील लोकांपर्यंत या धोरणातील या ठळक बाबी प्रसारित कराव्यात असे आवाहन केले. यावेळी एनसीसी कॅडेटसच्या वतीने मंदार बामनोदकर, सुधीर पाटील, आकाश कोळी, आशराज गाढे, अजय पाटील यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आपली मनोगते व्यक्त केली व केंद्र सरकार आणि एनसीसी अधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून या धोरणाची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती प्रसारीत करण्याचा मनोदय व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंदबापू वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन, सुभेदार मेजर कोमलसिंग, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, सर्व सन्मा प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व कॅडेटस यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button