World

And..! मिस युनिव्हर्स 2021 इज हरनाझ संधू..! तब्बल 21 वर्षांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा..!

And..! मिस युनिव्हर्स 2021 इज हरनाझ संधू..! तब्बल 21 वर्षांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा..!

इस्त्राईल येथे संपन्न झालेल्या मिस युनिव्हर्स 2021 ह्या स्पर्धेची विजेती हरनाझ संधु ही ठरली आहे. आज सोमवारची सकाळ ही भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण ठरली.मिस युनिव्हर्स २०२१ चा किताब जिंकून भारताची हरनाझ संधू विश्वसुंदरी बनली आहे. तब्बल २१ वर्षांनंतर तिने भारताला हा ताज मिळवून दिला आहे. याआधी २००० साली अभिनेत्री लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. आता

मिस युनिव्हर्स या स्पर्धेत ७५ हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील तीन देशातील सौंदर्यवतींनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. यात दक्षिण आफ्रिका, पॅराग्वे या दोन्ही सौंदर्यवतींना मागे टाकत भारताच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावला.

कोण आहे हरनाझ संधू?

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.

किताब जिंकल्यानंतर हरनाझ म्हणाली की, मी देवाची ऋणी आहे. सोबतच माझ्या पालकांचंही मी आभार प्रकट करते. मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल द मिस इंडिया ऑर्गनायझेशनचंही मी आभार मानते, असं हरनाझ म्हणाली. भारतासाठी 21 वर्षांनंतर मिस युनिवर्सचा किताब परत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असं देखील हरनाझ म्हणाली.

कमी वजनामुळे होत असे चेष्टा

विश्वसुंदरीच्या शर्यतीत असणारी हरनाझ शाळेत असताना फार बारीक होती. तिच्या कमी वजनामुळे तिची अनेक वेळा चेष्टा व्हायची. यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने यावर मात केली. आणि आरोग्याची काळजी घेतली.

हरनाझने मिळवलेले किताब

2017 – टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 – मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 – फेमिना मिस इंडिया पंजाब
2021 – मिस युनिवर्स इंडिया

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button