8 व्हेंटिलेटर सुरूच आहेत : वैद्यकीय अधीक्षक शिंदे
चांदवड उदय वायकोळे
चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या कोव्हीड सेंटर ची सध्या नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून व्हेंटिलेटर 25 पैकी 23 व्हेंटिलेटर धूळ खात असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रात छापून आले ,मात्र चांदवड वैद्यकीय अधीक्षकांनी ठोस प्रहार प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की ज्या दिवशी पाहणी करण्यात आली त्या दिवशी 25 पैकी 15 व्हेंटिलेटर होते व 10 जिल्हा रुग्णालयास देण्यात आलेले होते. त्यानंतर लासलगाव येथील रुग्णालय 15 पैकी 7 व्हेंटिलेटर देण्यात आले असून उर्वरित 8 व्हेंटिलेटर हे चालू अवस्थेत असल्याचे सांगितले.याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक,लासलगाव रुग्णालय यां चेशी झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती त्यांनी दिली,अजून उपलब्ध असलेल्या 8 पैकी 4 व्हेंटिलेटर नांदगाव येथील रुग्णालय देण्यात येणार असून त्यांनी तशी मागणी केली असल्याचे डॉ शिंदे यांनी सांगितले.
पुढे डॉ शिंदे म्हणाले की स्टाफ ची कमतरता असूनही कोव्हीड सेंटर येथे सेवा सुरू आहेत,तरी शासनाकडून डॉक्टर उपलब्ध होणेसुद्धा गरजेचे आहे.






