ताडदेव येथील युसूफ मेहरअली विद्यालयातील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांचा ‘स्वच्छता पखवडा ‘ कार्यक्रम उत्साहात संपन्न …!
महेश्वर भिकाजी तेटांबे
ताडदेव येथील युसूफ मेहरअली विद्यालयातील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांचा दि.१ डिसेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या कालावधीत ‘स्वच्छता पखवडा ‘ कार्यक्रम जोशमय उत्साहात साजरा करण्यात आला. या पंधरा दिवसात छात्रसैनिकांनी गिरगाव चौपाटीचा समुद्रकिनारा, ताडदेव परिसरातील सार्वजनीक प्रेक्षणीय उद्यान, त्याचप्रमाणे शाळेच्या आजू बाजूचा परिसर स्वच्छता, स्वच्छतेविषयी समाजात जनजागृती व्हावी यासाठी रेलीचे आयोजन, हात पाय धुण्याचे महत्व, ओला व सुखा कचरा याचे विघटन अशा स्वच्छतेविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम एन.सी.सी. विभाग प्रमुख चिफ ऑफिसर श्री. जे.बी.औटी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न करण्यात आला. ह्या कार्यक्रमास युसूफ मेहरअली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वसंत चौधरी आणि एन.सी.सी. १ महाराष्ट्र बटालियनचे कमांड़िग ऑफीसर लेफ्टनंट श्री. विवेक चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.






