sawada

सावदा येथे गोरईखऱ्या या जंगली प्राणीची दहशत : नागरिक हैराण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.

सावदा येथे गोरईखऱ्या या जंगली प्राणीची दहशत : नागरिक हैराण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील मुख्य चौक म्हणजे संभाजी चौक, गांधी चौक, इत्यादी भागात हा हनी बेजर (गोरईखऱ्या) नावाचा धरती वरील सर्वात भयमुक्त व इजादायक जंगली प्राणीने गेल्या बरेच दिवसां पासुन दहशत माजवली असुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सदरील प्राणी हा दिसायला नेवला (मुंगूस) प्रमाणे मात्र आकाराने त्यापेक्षा मोठा व जंगली हनी बेजर रात्रीच्या वेळी संचारकरतो तसेच जिवंत विषारी सांप.नाग, विंचू सहीत विविध मृत्यू झालेले प्राणी खाणाऱ्या या इजादायक व अतिशय घातक जंगली प्राणीची नागरिकांत मोठी दहशत पसरली आहे रात्रीच्या वेळी ११ किंवा १२ नंतर हे प्राणी पाच ते सहा इतक्या संकेत सदर परिसरात संचार करताना अनेकांना दिसले आहे सदरील प्राणी हा लहान मुलांवर हल्ला करतो ग्रामीण भागात चर्चा असल्याने नागरिकात अधिक चिंता वाढलेली आहे तरी सदर इजादायक जंगली प्राणी हनी बेजरांचे लवकरात लवकर बंदोबस्त होणे गरजेचे आहे

अशी मागणी सदरील भागाचे नागरिक करीत असून वन विभागाचे अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन सदरील प्राणी पासून कोणास दुखापत इजा होण्या आधीच त्याच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि नागरिकांना सदर प्राण्यापासून भयमुक्त करावे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button