शिवकालीन रत्नगडला होणार भव्य सभामंडप आज पार पडले भुमिपुजन,
वॉटर एटीएमचेही झाले उद्घाटन
सुनील घुमरे लनाशिक विभाग प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपुजन आज करण्यात आले असुन गावात पिण्याच्या पाण्याचे एटीएम बसविण्यात आले आहे. 10 रु मध्ये मिळणार 20 लिटर पाणी अशी व्यवस्था ग्राम पंचायत कडुन करण्यात आली आहे.वॉटर एटीएमचे उद्घाटन माजी उपसरपंच सोमनाथ बस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. शिवकालीन रत्नगड परिसरात आमदार निधीतुन सभामंडप मंजुर असुन त्या भव्य सभामंडपाच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे सर यांच्या प्रमुख उपस्थित सभामंडपाचे भुमिपुजन करण्यात आले.
रत्नगड परिसरात ग्रामपंचायत व रत्नगड विकास समिती यांच्याकडुन रत्नगड येथे येणाऱ्या भाविकांसाठी अनेक महत्वाच्या व्यवस्था करण्यात येत आहे.तसेच गावातील दशक्रिया शेड परिसरात ग्राम पंचायतकडुन दोन शेड बांधले असुन तिथे सिमेंटचे ब्लॉक बसविण्यात येणार आहे. व गावातील अंगणवाडी मध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे सर,सरपंच वैशालीताई बस्ते,उप सरपंच पुंडलिक गाडे,ग्रामसेवक बेडसे,गणेश बोरसे,सुनिल शेटे, राजु लोणारी,ग्रामपंचायत सदस्य,रत्नगड विकास समिती व शिंदवड ग्रामस्थ उपस्थित होते.






