इंदापूर तालुक्यात आढळले दोन कोरणा ग्रस्त आढळले .
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: दिवसेंदिवस इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तब्बल ११दिवसात तालुक्यात नव्याने ६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने इंदापूर करांची चिंता अधिकच वाढली आहे.
आज बुधवार दि. १ जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावातील एका ३५वर्षीय महीलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला तर आजच इंदापूर शहरातील एका ५७ वर्षीय पुरुषाचा ही कोरोना चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आला असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले आहे.
जंक्शन येथील महीला पुणे येथील बिर्ला रूग्णालयात उपचार घेत असून तीच्या संपर्कात जंक्शन परिस्थितील जवळपास १३ व्यक्ती आल्या आहेत. तर इंदापूर शहरातील रूग्ण पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या संपर्कात ८व्यक्तींचा समावेश आहे. या दोन ही रुग्णांच्या संपर्कात अंदाजे २१ व्यक्ती आल्या असून या सर्वांना इंदापूर कोवीड सेंटर मध्ये निगरानी खाली ठेवण्यात येणार असून त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. त्यानंतरचं पुढे किती संख्या वाढणार ते स्पष्ट होईल.
इंदापूर तालुक्यात आता कोरोनाचे एकूण २५रुग्ण झाले असून यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १६रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी देखील सोडले आहे. तर पुणे येथे ४ रुग्णावर तर मुंबई मधील टाटा रुग्णालयात एकावर उपचार सुरु आहे. इंदापूर कोवीड केअर सेंटर मध्ये एका रुग्णावर तर बारामती मधीक रुई ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.






