Aurangabad

डॉ. काबरा विरुद्ध मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, आंदोलनकर्त्यांना अटक

डॉ. काबरा विरुद्ध मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, आंदोलनकर्त्यांना अटक
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल करणाऱ्या ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ चळवळीला फंडिंग केल्याचा आरोप करीत डॉ. प्रवीण काबरा यांना काळे फासण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काबरा हॉस्पिटल येथे हे आंदोलन झाले.
सुनील कोटकर, रवि कळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय सावंत, भरत कदम , संतोष गायकवाड, गणेश उगले पाटील , निलेश ढवळे , पंढरीनाथ गोडसे , दत्तात्रेय घारे अशी आंदोलनकर्त्यांची नावे आहेत.
दरम्यान, महेशनगर येथील डॉ. काबरा यांच्या रुग्णालयात मराठा क्रांती मोर्चाचे लोक जाणार असल्याचे कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनापूर्वीच बंदोबस्त लावला. कार्यकर्ते येताच पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी एक मराठा,लाख मराठा, डॉक्टर काबरा विरोधात घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा नोंदविला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button