Pune

राज्य राखीव दलाच्या गाडीला अपघात, टायर फुटल्याने बस उलटली..

राज्य राखीव दलाच्या गाडीला अपघात, टायर फुटल्याने बस उलटली..

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

सोलापूरहून दौंडकडे फायरिंग करण्यासाठी हे दल चालले होते

राज्य राखीव दलाच्या गाडीला अपघात अपघात झाला आहे. मागचे टायर फुटल्याने बस उलटली आहे. इंदापूर जवळील बिजवडी येथे ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. यावेळी काही जवान किरकोळ जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

राज्य राखीव दल बल गट क्रमांक 10 सोलापूरची ही गाडी आहे. सोलापूरहून दौंडकडे फायरिंग करण्यासाठी हे दल चालले होते. मात्र इंदापूरच्या नजिक बिजवडीच्या अगदी पुलाजवळच येताच गाडीचा मागील डावा टायर फुटल्याने ही बस उलटून अपघात झाला.

आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एम.एच.13 पी.ओ.437 क्रमांकाची ही बस आहे. गाडीचे चालक यु.आर.सातव यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात तर एस.पी.चव्हाण यांना डाॅ.मगर यांच्या रूग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी इंदापूर महामार्ग पोलीस ए.एस.आय.जाधव, आहेर, मदने व वाघ यांसह सरडेवाडी टोल प्रशासन घटनास्थळी धावून आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button