Maharashtra

कुरणी येथे शालेय पोषण आहार आपल्या घरी

कुरणी येथे शालेय पोषण आहार आपल्या घरी

कोल्हापूर प्रतिनिधी

कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केला आहे. या लॉक डाऊन मुळे गरीब व सामान्य माणसांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी व लहान बालके यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग ने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहाराचे वाटप करण्याचा आदेश शासनाने काढला आहे मात्र संचारबंदी मुळे सर्व शाळा बंद आहेत. अशावेळी संचार बंदीचे उल्लंघन न करता आणि शासनाच्या आदेशाचे पालन करीत कुरणी ता. कागल या जिल्हा परिषद परिषद शाळेने शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार घरोघरी जाऊन वाटप केले.

संचारबंदी असल्यामुळे शाळेत गर्दी होऊ शकते, कोरणा टाळण्यासाठी नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक यांनी शालेय पोषण आहाराचे दोनशे विद्यार्थ्यांना वाटप केले. याबाबत शाळेचे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button