Amalner

Amalner: एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत द्रौ.रा.कन्याशाळेचे घवघवीत यश

Amalner: एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत द्रौ.रा.कन्याशाळेचे घवघवीत यश

आकांक्षा पाटील ने पटकावला तालुक्यात प्रथम क्रमांक

अमळनेर(प्रतिनिधी):-
खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा.कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून ६ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.आकांक्षा राजेश पाटील या विद्यार्थिनीने १८० पैकी १२३ गुण संपादन करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.यासोबतच साळुंखे कृतिका रुपेश,पटेल तन्वी योगेश,महाजन नंदिनी दिनेश, तायडे तनिष्का मनोजकुमार,मराठे मानसी विजय या विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आल्या असून शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत.
शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक डी.एम.दाभाडे,एस.पी.बाविस्कर,
शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.उपशिक्षक एस.ए.खांजोडकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button