Paranda

ग्राम पंचायत निवडणूकीत परंडा तालूक्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का – परंडा तालूक्यात शिवसेनेचे वर्चस्व

ग्राम पंचायत निवडणूकीत परंडा तालूक्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का – परंडा तालूक्यात शिवसेनेचे वर्चस्व

सुरेश बागडे परंडा

परंडा : दि .१८ ग्राम पंचायत निवडणूकीत परंडा तालूक्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला असुन सोनारी , अनाळा , चिंचपुर , लोणी , आसू , कंडारी , कात्राबाद , राजुरी , डोमगाव , ढगपिंपरी , जवळा , टाकळी,इनगोंदा , वागे गव्हाण , देऊळगाव , खासापुरी , रुई दुधी या गावा सह अनेक गावाची सत्ता मतदारांनी उलथून टाकली आहे . या निकालात तालूक्यावर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले आहे . तर राष्ट्रवादीने देखील चांगली कामगीरी केली आहे .

परंडा तालूक्यातील ६५ ग्रामपंचायत साठी दि १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते निवडणूक चुरशीत झाल्याने संपूर्ण तालूक्याचे लक्ष निकाला कडे लागले होते सोमवार दि १८ जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथे मतमोजणी करण्यात आली निकाल बघण्या साठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती .

संपुर्ण तालूक्याचे लक्ष लागलेल्या सोनारी ग्राम पंचायत मध्ये सत्ता बदल झाले असुन राष्टवादी चे नेते नवनाथ जगताप यांच्या पॅनल ने मुसंडी मारून ९ पैकी ८ जागेवर विजय मिळवीला आहे .

चिंचपूर ( बु ) येथील अनेक वर्षाच्या सत्तेला पराभवाचा धक्का बसला असुन , चिंचपुर ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले आहे .

तर लोणी ग्रामपंचायत मध्ये सत्ता बदल झाली असुन महाविकास अघाडीचे ७ तर भाजपा चे २ सदस्य निवडून आले आहे .

तर अनाळा येथील अनेक वर्षाची सत्ता मतदारांनी उलथून टाकली असुन भाजप सेना आघाडी ने ९ पैकी ७ जागेवर विजय मिळवीला आहे .

कंडारी येथील अनेक वर्षाच्या सत्तेत बदल झाला असुन शिवसेने ९ पैकी ९ जागेवर विजय मिळवीला आहे .

तर कात्राबाद येथील सत्ता बदल झाला असुन ७ पैकी ५ जागा राजाभाऊ शेळके गटाने जिंकल्या आहे .

ढगपिंपरी ग्रामपंचायत मध्ये सतांतर झाले असून शिवसेने ने ७ पैकी ६ जागेवर विजय मिळवीला आहे .

इनगोंदा ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी जगताप गटाचा पराभव झाल्याने संतातर झाले आहे .

देऊळगाव येथील बंडू बदर गटाने मुसंडी मारून सर्व जागा जिंकल्याने देऊळगाव ग्राम पंचायत मध्ये संतात्तर झाले आहे .

आसू ग्रामपंचायत मध्ये महाविकास अघाडीने बाजी मारली असल्याने ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले आहे.

राजुरी ग्रामपंचायत मध्ये महाविकास अघाडीने बाजी मारल्याने सत्तांतर झाले आहे .

डोमगाव येथे सत्तांतर झाले असुन महाविकास अघाडीने बाजी मारली आहे .

कुक्कड गाव ग्राम पंचायत मध्ये सत्तांतर झाले असुन शिवसेने ने विजय मिळवीला आहे .

जवळा ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असुन शिवसेनेने विजय मिळवीला आहे .

खानापूर ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून शिवसेने बाजी मारली आहे .

वाटेफळ येथे भाजपा चा पराभव करून राष्ट्रवादीचे दिपक भांडवल कर यांनी विजय मिळवीला आहे .

तर सिराळा येथे शिवसेनेचे रेवण ढोरे ,
वाकडी चे धनंजय हांडे , अवार पिंपरी चे सुरेश डाकवाले , यांना सत्ता राखन्यात यश आले आहे.

या निवडणुकीत तालूक्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला असुन मतदारांनी अनेक ग्रामपंचायत मध्ये बदल घडऊन आनला आहे .
विजयी झालेल्या शिवसेनेच्या नवीन सदस्यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची भेट घेऊन विजया च्या घोषणा दिल्या .
मतमोजणी केंद्रा बाहेर विजयी उमेरवारांनी जल्लोष केला.

निवडणूक आधिकारी तथा तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शना खाली २५ टेबलावर मतमोजणी करण्यात आली.

मतमोजणी ठिकाणी पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या नेतृत्वा खाली पोालीस उप निरिक्षक मोमीन , पोलिस उप निरिक्षक ससाने , पो . उप निरिक्षक बनसोडे अंभीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक खांडेकर व पोलिस कर्मचारी , होमगार्ड यांचा फौज फाटा तैनात करून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला . या वेळी उप विभागीय पोलिस आधिकारी विशाल खांबे यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला .

निवडणूक आधिकारी तथा तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शना खाली २५ टेबलावर मतमोजणी करण्यात आली.
परंडा तालूक्यातील ग्रामपंचायत च्या ५६६ सदस्यांची निवडी झाल्या असून ७० ग्रामपंचायत च्या आरक्षणा कडे नजरा लागल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button