Nashik

दिपोत्सवातुन कोरोणा योद्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त..

दिपोत्सवातुन कोरोणा योद्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त.. सुनिल घुमरे नाशिक Nashik : त्रिपुरारी पौर्णिमाच्या पावन पर्वा निमित्ताने तसेच कोरोणा विषाणुच्या काळात देशाचे संरक्षण करणारे सीमेवरील जवान,जनतेची सेवा करणारे वैद्यकिय कर्मचारी,बळीराजा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “स्वराज्य इतिहासाच्या पाउलखुणा परिवार” आणि “शोधवाटा- चला पाहुया सह्याद्रीच्या पाऊलखुणा परिवार” यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराम मंदिर म्हसरुळ ता.जि.नाशिक येथे 29 नोव्हेंबरच्या पुर्व संध्येला कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळेस रांगोळी कलाकर अजय जाधव मुंबई यांनी दुर्गसंवर्धन विषयावर काढलेली आकर्षक रांगोळी त्याच प्रमाणे तेज आर्ट क्रियेशन नाशिक यांनी शिवरायांचे पोर्ट्रेट रांगोळी, शहिद जवान आणि बळीराजाच्या आकर्षक रांगोळ्या भोवती दिव्यांचा लखलखाट ही करण्यात आला.त्या नंतर भारतभूमी चे रक्षण करताना शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिपोत्सवाची सुरवात महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांच्या चरणी दिप प्रज्वलन आणि आरती करुन करण्यात आली. जीवन कला मंडळाचे अध्यक्ष केदारे आप्पा यांनी उपस्थित शिलेदारांना भक्ती,शक्ती अन युक्ती याच प्रतिक असलेल्या शिवराम मंदिरा विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले किमहाराजांच्या मुर्तीच्या वर भगवतीची मुर्ती आहे जी महाराजांना प्रसन्न होती.उजव्या व डाव्या बाजुला चंद्र सुर्य म्हणजे जो पर्यंत चंद्र-सुर्य आहेत तो पर्यत या शिवतेजाची किर्ती पसरत राहील .दोन्ही बाजुला महाराजांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास आणि संत तुकाराम आहे.समाजात मोठ्या प्रमाणावर अराजकता माजेल तेव्हा तेव्हा शिवरायांसारखे युग पुरुष जन्माला येऊन समाजाची विस्कटलेली घडी नीट करत असतात.शेवटी त्यांनी उपस्थित तरुणांना तुम्ही जे कार्य करत आहात ते कोण काय म्हणत या कडे लक्ष न देता निरतंर करत रहा कारण एक दिवस तेच टिकाकार तुमच्या खांद्या खांदा तुमच्या कार्यात सहभागी होतील.
दुर्ग संवर्धक शुभम मेधने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितल कि, शिवरायांनी आपल्याला स्त्री सन्मान शिकवला.आज आपण कुठे स्त्री सन्मान करण्यात किंवा स्त्रीच्या सुरक्षेस आपण कुठे तरी कमी पडतोय.महाराजांच्या काळातील मर्दानी खेळ हे लुप्त होत चालले आहेत .मर्दानी खेळांच प्रशिक्षण हे प्रत्येक भगिनी घेतलच पाहिजे.यासाठी लवकरच परिवारच्या वतीने मर्दानी खेळ प्रशिक्षणा आयोजन लवकरच करण्यात येणार आहे अस त्यांनी सांगितले.शोधवाटा परिवाराच्या संस्थापक अर्चनाताई शिंदे यांनी परिवाराने आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन मोहिमा तसेच परिवाराच्या वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले.
स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचे सहसंस्थापक सत्यनारायण दिक्षीत यांनी शोधवाटा परिवारा,जीवन कला मंडळ व शिवराम मंदिराचे सर्व व्यवस्थापकांच्या सहकार्या बदल शिवरायंची मुर्ती देऊन आभार मानले तसेच जो पर्यंत आपण इतिहास वाचत नाही इतिहासाचा अभ्यास करत नाही तो पर्यंत आपण शून्य आहोत आणि तो पर्यंत आपल्याला आपलं भविष्य ही उमगणार नाही म्हणूनच आपण सर्वांनी महाराजांचा खरा इतिहास वाचावा आणि गडकिल्ले संवर्धन ही काळाची खूप मोठी गरज आहे तेव्हा सर्वांनी गडकिल्ले संवर्धन मोहिमेत नेहमी सहभाग घ्यावा ही कळकळीची विनंती करत उपस्थित शिलेदारांना परिवाराच्या पुढील मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ही केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन दादा यांनी केले. कार्यक्रमास शिववाद्यपथकाचे विक्रांत रसाळ,दुर्ग प्रेमी कुणाल लभडे,तेजस्विनी शिंदे ,शुभम बेळे,अजय जाधव मुंबई ,पंकज जावरे ,वैभव सातकर,गणेश ,सुशांत महाजन,अजय शिंदे,साई आरगडे,संदिप बर्शिले, दिपक दुघड,विशाल जाधव तसेच शोधवाटा परिवार, जीवनकला मंडळ आणि स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचे सहकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button