AmalnerMaharashtra

?️ कोरोना अपडेट..घरातच रहा.. काळजी घ्या..तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे जनतेला आवाहन

?️ कोरोना अपडेट..घरातच रहा.. काळजी घ्या..तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे जनतेला आवाहन

साळीवाडा,शाह आलम नगर,झामी चौक,इस्लाम पुरा कॉन्टेनमेंट झोन म्हणून घोषित

जळगांव जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अमळनेर येथे असल्याने अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी जनतेला आवाहन केले आहे..

1 अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस कळविणेत येते की, अमळनेर तालुक्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे अमळनेर तालुक्यातील शहाआलम नगर, झामी चौक, इस्लामपुरा, आमलेश्वर नगर व साळीवाडा हे भाग कन्टेनमेन्ट झोन म्हणून घोषीत करणेत
आलेले आहे.

2. सदर कन्टेनमेन्ट झोन ठिकाणामधुन कोणत्याही व्यक्तीस बाहेर जाता येणार नाही तसेच बाहेरुन कन्टेनमेन्ट झोनमध्ये जोता येणार नाही (अत्यावश्यक सेवा वगळता), सदर निबंधाचा कोणीही उल्लंघन केल्यास त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल.

3. ज्या व्यक्तींना धुळे येथे डायलेसिस व इतर अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेकामी जायचे असेल अशा व्यक्तींनी श्री. आर.एस. चौधरी, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर
मो.नं.7058015232 यांचे whats app वर अर्ज करावे अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र देखील सादर करावी. परवानगी देखील Whats app द्वारेच मिळणार असल्याने आपण सदर क्रमांकाशी संपर्क साधावा व सदर परवानगीसाठी कार्यालयात कोणीही येऊ नये असे आवाहन
मा.उपविभागीय अधिकारी, अमळेनर भाग, अमळनेर यांनी केले आहे.

4. सर्वानी घरात राहुन प्रशासनास सहकार्य करावे. अत्यावश्यक (किराणा, भाजीपाला, दुध) सेवा सर्वांना घरपोहोच मिळणार आहे. सर्वानी काळजी घ्या घरातच थांबा, असे आवाहन
अमळेनर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button