Amalner

?️अमळनेर कट्टा…जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील नेते अमळनेरला यायला घाबरतात का..?पत्रकार राजेंद्र  पोतदार…

?️अमळनेर कट्टा..जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील नेते अमळनेरला यायला घाबरतात का..?पत्रकार राजेंद्र पोतदार

अमळनेर शहरात दररोज मृत्यूचे तांडव सूरू असतांना आरोग्य यंत्रणा मनूष्यबळा अभावी हतबल झाली असून नागरीकांमध्ये घबराहट पसरून कूणी बेड देता का म्हणत हवालदिल झाली आहे जिल्हा प्रशासनासह खासदार आजी माजी आमदारांनी यावर तातडीने तोडगा काढून जनतेला धिर देण्याची गरज आहे गेल्या चार दिवसांत दररोज अमळनेर शहरात कोरोना रूग्णांनी शंबरी पार केली यात सर्वाधीक रूग्ण हे शहरी भागातीलच असले तरी ग्रामिण भागातही हळहळू कोरोनाने पाय पसरायला सूरूवात केली आहे धूळवडीच्या दिवसा पासून मृत्यूची आकडेवारीत आजही वाढ होवून हि संख्या १०० चे पार झाली आहे नागरीकांनी दक्ष राहाण्याचे आवाहन जात केले आहे चोपडा रोडवरील स्मशान भूमित सतत आग धगधगत असून गेल्या अनेक वर्षात प्रथमच आम्ही मृत्यूचे तांडव पहिल्यांदा पाहात असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे पहिल्या चितेची आग थंड होत नाही तोवर दूसरी चिता रचली जात आहे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार स्मशान भूमी असली तरी कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार करणारे मनूष्यबळ मोजके असल्याने चोपडा रोडवरील एकमेव स्मशान भूमित अंत्यसंस्कार केले जात आहेत गेल्या चार ते पाच दिवसात दररोज १५ ते २० मृतदेह अंत्यसंस्कारा करिता येत आहेत त्यामूळे अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावी लागत आहे काही रूग्ण तर धास्तीनेच गतप्राण होत आहेत सख्खे भाऊ पती पाठोपाठ पत्नी अशा मृत्यूची घटनेने मन हेलावून जात आहे या वेळेचा कोरोना विषाणू हा समूह संसर्गाचा आजार असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे* ग्रामीण रूगणालयात ३० खाटांची व्यवस्था असतांना ४५ हून अधिक रूग्ण दाखल आहेत तर ईंदिरा भवनात लोक वर्गणीतून ऊभारलेल्या तात्पूरते कोविड सेंटरही फूल्ल झाले असून या ठिकाणी ५० हून अधिक रूग्ण ऊपचार घेत आहे खाजगी रूग्णालयात बेडच शिल्लक नाहीत आँक्सीजनचा मोठ्या प्रमाणात तूडवडा जाणवत आहे तर रूग्णांना प्रभावि ठरणारे रेमडेसीवार या ईंजेक्शन्सचा सतत तूडवडा भासत आहे १२०० ते १५०० रूपयात मिळणारे हे ईंजेक्शन माजी आ शिरिष चौधरी यांचे सौजन्याने सामाजीक कार्यकर्ता पंकज चौधरी यांनी ८९९ रूपयात काल पासून मूबलक ऊपलब्ध करून दिले आहे तालूक्याची आरोग्य यंत्रणा व प्रशासनातील अधिकारी पूरेपूर प्रयत्न करित असले तरी मनूष्यबळाची कमतरता भासू लागली आहे शहरातील काही वैद्यकीय सेवा देणारेही पॉझीटीव रूग्णांच्या यादीत आल्याने त्यांनी रूग्णालये बंद केली आहे त्यामूळे रूग्णाचे हाल होत आहेत बहूगूणे हॉस्पीटल व नर्मदा मेडीकल फांऊडेशन ओव्हरफ्लो झाले आहे गेल्या १५ दिवसांपासून शहरात विविध भागात पालीकेतर्फे ३ ते ४ टिम द्वारे दररोज कोरोना चाचणी कँप घेतले जात आहेत त्यात ९० ते १०० रूग्णांचे अहवाल पॉझीटीव येत आहेत मात्र त्यांना ऊपचाराची सुविधाच ऊपलब्ध होत नाही चाचणी कँप सारखेच *शहरात लवकरच नविन ऊपचार केंद्राची ऊभारणी न केल्यास शहरातील परिस्थीती विदारक असेल* गेल्या वर्षीच्या तूलनेत या वेळीचा कोरोनाने झपाट्याने वाढ होवून रूग्णांचे हाल होत आहेत *माजी आमदार साहेबराव पाटीलही या विळख्यात अडकले आहेत रोटरी व मंगळ ग्रह संस्थानने व काही मोजक्या दात्यांनी पूढाकार घेवून लोकवर्गणी दिली ईतर राजकीय नेते सामाजीक संस्था फिरकतही नाहीत खासदार ऊन्मेश पाटील यांचे दृष्टीने तर अमळनेर तालूका त्यांचे मतदार संघातच नाही याच भूमिकेत दिसत आहेत पालकमंत्रीही फिरकले नाहीत जिल्हा प्रशासन लॉकडाऊन मध्येच अडकले आहेत माजी आमदार स्मिता वाघ यांनी जळगावलाच होम टाऊन केले आहे जिल्ह्यातील भाजपाचे नेते बंगालच्या निवडणूकीत गूंतले आहे तर स्थानिक भाजपा पदाधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत* प्रभागातील बहूतांश नगरसेवक त्यांचे परिने शर्थीचे प्रयत्न करित आहेत मात्र तोकडी आरोग्य यंत्रणामूळे तेही हतबल झाले आहेत बाजार समितीच्या प्रशासकही जणू होम कॉरंटाईन झाले आहेत अशा परिस्थीतीत जनतेला धिर देवून त्यांची जिवितहानी व कूटूंब वाचविण्यासाठी या परिस्थीतीकडे गांभिर्याने घेवून तातडीने हालचाल करतील अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे *शहरातील मोठी शाळा महाविद्यलय किंवा मंगल कार्यालयात जंबो कोरोना सेंटरची तातडीने ऊभारणी न केल्यास शहराची परिस्थीती विदारक असेल याला जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रशासन राजकीय नेतेच जबाबदार ठरतील कारण जनतेत आता जनजागृती वाढली आहे हि वेळ बिकट असून जवाबदारी झटकून किंवा आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button