मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील सार्वजनिक खांबावरील दिवा बत्तीगुल…
विद्युत मंडळासह ग्रामपंचायतने दखल घ्यावी
विद्युत खांबावरील लोंबकळत असलेल्या विद्युत वाहक जीर्ण वीज तारांंखालून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच
रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी
मोठा वाघोदा.ता.रावेर. मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील आदिवासी दलीत मुस्लिम वस्त्यां मथील विद्युत खांबावरील( स्ट्रीट लाईट)) दोन दिवसांपासून बंदच विद्युत मंडळ शाखेच्या डोळ्यावर पट्टी ?? निंभोरा रस्त्यावर नाल्याशेजारच्या वाडे वस्त्या रस्ते काळोख अंधाराचे छायेत लोंबकळत असलेल्या जीवघेणा विद्युत तारांची तोंडी तक्रार ही केराच्या टोपलीत?? मोठा वाघोदा येथील विद्युत मंडळ कनिष्ठ अभियंता यांचे तक्रारी बाबत कानावर हात? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय?? मोठा वाघोदा येथे काही वर्षांपूर्वी लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा केळी घड भरायला शेतात जात असतांना विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरील लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीच्या वीज तारांचा केळीचा ट्रक ला स्पर्श होऊन केळी वाहतूक करणाऱ्या ४ केळी कामगारांचा जीव या विद्युत वाहिनीच्या वीज तारांंनी घेतला होता त्यावेळी मोठा वाघोदा येथील *व बर्निग ट्रक* ही घटना महाराष्ट्र भर गाजली होती लोंबकळणार्या विद्युत तारांनी गरीब मजुरांचे प्राण घेतले होते तीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची दाट शक्यता आता सुद्धा जैसे थे आहे वर्षभरा पुर्वी विद्युत खांबावर काम करीत असतांनाच यशवंत नगरात ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या एका रोजंदारीवर काम करत असलेल्या तरुणास विद्युत तारांचा स्पर्शाने शॉक लागून खाली फेकला जाऊन जखमी झाला होता सुदैवाने जीवितहानी टळली होती या प्रकरणात विद्युत मंडळ शाखेने सारवासारव करून प्रकरण मिटवते घेतले होते मात्र वारंवार तक्रारी करुननही विद्युत मंडळ मोठा वाघोदा कनिष्ठ अभियंता मुद्दाम दुर्लक्ष करीत असावेत का? की आणखी द बर्निग ट्रक सारखे घटनेच्या पुनरावृत्ती ची वाट पाहत असावेत का?? नाहीच तर मग या नागरिकांच्या जीवघेणी तक्रारीची दखल का घेतली जात नाही??? विद्युत पारेषण महामंडळ च्या वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन या मोठा वाघोदा तालुका रावेर गावातील लोंबकळणार्या जीर्ण विद्युत वाहक ताराबाबत योग्य ती काळजी घेऊन् उपाय योजना करण्याची मागणी मोठा वाघोदा येथील सुज्ञ नागरिकांसह गाववासियांकडून केली जात आहे






